‘कांटा लगा’ गर्ल शेफालीचं निधन, जन्मकुंडलीतून मृत्यूचा इशारा? पारस छाबडाचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘कांटा लगा’ गर्ल शेफालीचं निधन झालंय. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या मृत्यूचं भाकित आधीच केलं असल्याचं सांगितलं जातंय. आपण यासंदर्भात सविस्तर जामून घेऊया.

Chhabra Predicted Shefali Death In Advance Horoscope Coincidence : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘कांटा लगा’ या आयकॉनिक गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली, शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी, 27 जून रोजी मुंबईत तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, शेफालीच्या छातीत अचानक दुखायला लागल्यावर, तिच्या पतीने – अभिनेता पराग त्यागीने तिला तातडीनं एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित केलं. अद्याप तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री शेफालीबद्दलचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेता पारस छाबडा त्यांच्या पॉडकास्टमध्ये शेफालीच्या कुंडलीविषयी बोलताना दिसतो. त्यामध्ये तो म्हणतो की, तुझ्या कुंडलीत आठव्या घरात चंद्र, बुध आणि केतू आहेत. चंद्र-केतूचं मिलन अत्यंत अशुभ मानलं जातं. आठवं घर मृत्यू, रहस्य, अपघात आणि जीवनातील अचानक बदल दाखवतं. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. काहीजण यामधून भविष्याचा इशारा असल्याचं सांगत आहेत. पारस आणि शेफाली ‘बिग बॉस 13’ मध्ये एकत्र सहभागी झाले होते. शेफालीचा पती पराग त्यागी पारसचा मित्र असल्यामुळे, शोमध्ये पारस तिला ‘भाभी’ म्हणून हाक मारत असे.

‘कांटा लगा’ गर्ल ते बॉलिवूड अभिनेत्री

शेफाली जरीवालाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘कांटा लगा’ या गाण्याने केली. त्यातील तिचं हटके लूक आणि डान्समुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. पुढे ती ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. तिने ‘मुझसे शादी करोगी’ (2004) या चित्रपटातही एक विशेष भूमिका साकारली होती. यात ती सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्यासोबत झळकली होती.

काळजाला चटका लावणारा निरोप

शेफाली जरीवाला : एक नाव, एक चेहरा, जो 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला लाखो मनात घर करून गेला होता. तिच्या आयुष्याचा प्रवास हा ग्लॅमर, यश, संघर्ष आणि अचानक अश्रूंनी भरलेल्या शेवटाचा एक मिश्र अनुभव आहे. 2002 मध्ये आलेलं सुपरहिट रीमिक्स गाणं ‘कांटा लगा’ हे शेफालीच्या कारकिर्दीचं टर्निंग पॉइंट ठरलं.

हातात मोबाइल आणि कूल अ‍ॅटीट्यूडने नाचणारी ती ‘कांटा लगा गर्ल’ यथावकाश संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे ती युथ आयकॉन बनली.

फिल्म इंडस्ट्रीत झलक

शेफालीने त्यानंतर काही म्युझिक व्हिडिओज आणि चित्रपटांत काम केलं. 2004 मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या बॉलिवूड चित्रपटात ती सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्यासोबत झळकली. तिथे तिची छोटी पण लक्षवेधी भूमिका होती. शेफाली अभिनय क्षेत्रापासून काही काळ दूर होती, पण नंतर रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मध्ये पुन्हा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आली. तिच्या स्पष्टवक्तेपणा, आत्मविश्वासामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

शेफालीचं खाजगी आयुष्य

शेफालीचं पहिलं लग्न गायक मीट ब्रदर्सपैकी हरमीत सिंहसोबत झालं होतं, पण नंतर घटस्फोट झाला. यानंतर तिने अभिनेता पराग त्यागी याच्याशी विवाह केला. हे दोघंही अनेकदा सोशल मीडियावर आपल्या प्रेमळ नात्याचे क्षण शेअर करत असत. 27 जून 2025 रोजी, शेफाली जरीवालाचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आली. छातीत वेदना झाल्यानंतर पती पराग त्यागीने तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथेच तिला मृत घोषित करण्यात आलं. चाहत्यांच्या आठवणीत अजूनही तिचा ‘कांटा लगा’ मधील लूक तसाच ताजा आहे.

पण 27 जून 2025 रोजी तिच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर येताच, तिचे लाखो चाहते हादरले. ती केवळ 42 वर्षांची होती. इतक्या लवकर, इतकं अचानक शेफालीचं जाणं अनेकांसाठी धक्कादायक ठरलं. सोशल मीडियावर शोकसंदेशांचा पूर आला. तिचे चाहते, सहकारी कलाकार, मित्र आणि प्रियजन – सगळ्यांनीच तिच्या आठवणी शेअर केल्या. तिच्या चाहत्यांसाठी हे केवळ एका अभिनेत्रीचं निधन नाही. ही एका आठवणीच्या, एका युगाच्या शेवटाची सल आहे. शेफालीने फक्त काही म्युझिक व्हिडिओ आणि काही चित्रपट केले असले, तरी ती कायमची मनात घर करून गेली.

Leave a Comment