ग्लॅमरच्या झगमगाटाआड भयाण कटकारस्थान! नाना पाटेकर अन् तनुश्रीत नेमके कोणते वाद?

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर अन् बॉलिवूडमधली माफिया गँग खळबळजनक आरोप केले आहेत. तर ग्लॅमरच्या झगमगाटाचा पर्दाफाश केलाय. यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Actress Tanushree Dutta Allegations against Nana Patekar : ‘आशिक बनाया आपने’ हा बॉलिवूड चित्रपट आठवतोय का? होय. एकेकाळी बॉलिवूड विश्वात खळबळ माजवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.यावेळी कारण आणखी धक्कादायक आहे. तनुश्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव जोडलं जातंय. हे प्रकरण नेमकं काय? तनुश्री दत्ताची कारकिर्द कशी राहिली? नाना पाटेकर अन् तनुश्रीत नेमके कोणते वाद आहेत? ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

तनुश्रीच्या फ्रस्ट्रेशनचा उद्रेक

तनुश्री इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगते की, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून माझा माझ्याच घरात छळ सुरू आहे. मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा त्रास मी सहन करतेय. हा व्हिडीओ म्हणजे माझ्या आतल्या सगळ्या फ्रस्ट्रेशनचा उद्रेक आहे. या वर्षांत माझ्यावर इतक्या गोष्टी घडल्या की, त्या न सांगता राहवलं नाही. गुंड लोकांचा पाठलाग, माझा छळ, प्रोजेक्ट्समधून जाणूनबुजून बाहेर काढणं, माझे ईमेल्स आणि फोन हॅक होणं, हे सगळं माझ्यासोबत सातत्याने घडत आलंय. 2022 मध्ये मी उज्जैनला गेले कारण मला माझ्या घरात असलेल्या एका हाऊस हेल्पवर संशय आला. ती माझ्या अन्नात काहीतरी मिसळत होती. मी आजारी पडत होते. तिला बाहेर काढून मी उज्जैनला गेले. तिथेच माझा अपघात झाला.

मी ज्या रिक्षातून प्रवास करत होते त्याचे ब्रेक्स फेल करण्यात आले होते. मला कुणीतरी सतत फॉलो करत होतं, माझ्या हालचालींवर नजर ठेवत होतं. हा अपघात घडवून आणलेला होता. हे सगळं 2018 पासून सुरू झालं. मी जेव्हा नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले, त्यानंतरच हे सुरू झालं. पण नाना एकटा नाही. बॉलिवूडमध्ये एक माफिया गँग आहे, जी ही सगळी काळी कृत्यं करत असते. मी सुशांत सिंह राजपूतसारख्याच ट्रॅपमध्ये होते. फरक एवढाच, की तो गेला आणि मी वाचले. कारण मी त्याच्या मृत्यूच्या केसचा सखोल अभ्यास केला आहे. पूजा मिश्रा नावाच्या अजून एका मुलीवरही हेच घडलं. तिचे व्हिडीओ लोकांनी दुर्लक्षित केले, पण तिच्या बोलण्यात तथ्य असल्याचं देखील तनुश्रीने म्हटलंय.

कोण आहे तनुश्री दत्ता?

तनुश्री दत्ता ही 2004 सालची मिस इंडिया विजेती आहे. तिने 2005 मध्ये आशिक बनाया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कॉमर्समध्ये शिक्षण घेतलेल्या तनुश्रीने काही वर्षांतच बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान मिळवलं. तनुश्री दत्ताने 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स स्पर्धा जिंकली. यानंतर तिने भारताचं प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2004 या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत केलं. मॉडेलिंग क्षेत्रात तिचा प्रवास सुरू झाला. अनेक जाहिराती, ब्रँड अँबॅसडरशीप तिने मिळवली. तनुश्रीने बॉलिवूडमध्ये 2005 साली ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत इमरान हाशमी आणि सोनू सूद होते. या सिनेमातील हॉट सॉंग्स आणि बोल्ड लुकमुळे ती चर्चेत आली. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड इमेजमुळे ती बॉलिवूडमध्ये हॉट अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जात होती.

नाना पाटेकरांसोबत तनुश्रीचा वाद काय?

2008 साली ‘हॉर्न ओके प्लिज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या वादानंतर ती चर्चेत आली. काही काळानंतर ती इंडस्ट्रीमधून अचानक गायब झाली. मेडिटेशन अन् अध्यात्माच्या दिशेने वळली. 2018 मध्ये तिने नाना पाटेकर यांच्यावर #MeToo अंतर्गत आरोप करून एक मोठी सामाजिक चळवळ उभी केली. 2018 मध्ये भारतात सुरू झालेल्या #MeToo चळवळीच्या वेळी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर 2008 च्या सेटवर लैंगिक छळाचा आरोप केला. या प्रकरणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.

आज तनुश्री दत्ता ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून, सतत मानसिक छळ, इंडस्ट्रीतील माफिया, महिलांविरोधातील अन्याय अशा मुद्द्यांवर ती बोलत असते.

तिने नुकतेच अनेक व्हिडिओ शेअर करत स्वतःच्या छळाचा आणि मानसिक यातनांचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळख तनुश्री ओळखली जाते. तिला अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समधून दूर ठेवलं गेलं, असा आरोप तिने वारंवार केला आहे. नुकतेच व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Leave a Comment