Ajit Pawar Instructions to Office bearers at NCP Anniversary Celebration In Pune: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापनदिन सोहळा पार पडला आहे. पुण्याच्या बालेवाडीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा साजरा केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी एक महत्वाचं विधान केलंय. त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामध्ये कधीही तडजोड होणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपसोबत का गेले?
याचं देखील उत्तर अजित पवारांनी वर्धापनदिन सोहळ्याच्या भाषणात दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, बेरजेचे राजकारण करणारा पक्ष त्याच विचाराने पक्ष पुढे जात आहे. 2019 साली शिवसेना सोबत गेलो होतो. परंतु केवळ आंदोलन, विरोध करून चालत नाही. लोकांचे प्रश्न सोडवणे देखील गरजेचे आहे. एनडीएसोबत जायचे ठरवले. त्यावेळी अनेक पुरोगामी विचाराचे नेते त्यांच्यासोबत होते.
आजच्या या वर्धापनदिन सोहळ्याला छगन भुजबळ उपस्थित नाहीत. यावर अजितदादांनी म्हटलंय की, छगन भुजबळ , दत्ता भरणे यांचा परदेश दौरा पहिलेच ठरला होत. राष्ट्रवादी पक्ष नसून जनतेचा विचार करणारा आहे. सत्ता येईल सत्ता जाईल, परंतु पुरोगामी विचार जिवंत राहिला पाहिजे. सगळ्यांच्या अधिकारांचे रक्षण झालेच पाहिजे.
विचारांसोबत कधीही तडजोड केली जाणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अधिक जोमाने काम करायचे, असं सांगत अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील दिल्या आहे.
अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
• मुंबई वार्ड वाईज निवडणूक होईल .
• जसे प्रभाग पडतील, तशी आपली मानसिकता निर्माण करा.
• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेण्याची सूचना केल्या जातील.
• सर्व समाजाच्या जातीच्या लोकांना सभासद नोंदीत सहभागी करून घ्या.
• मोठ्या जिल्ह्यांनी पाच लाखांपेक्षा जास्त सभासद नोंदणी करा.
• स्थानिक स्वराज्य निवडणूक
सगळ्यांना संधी मिळणार
बहुजनांचा विचार करून पुढे जाऊ, जसे प्रभाग पडतील तसे पुढे जाऊ. आपली तयारी ठेवा, अशा सूचना अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहेत, काही ठिकाणी नाही. काही बाबतीत बदल करावे लागतील. आपल्याला जीवाचं रान करायचं, कुठे कमी पडायचं नाही.प्रयत्न करायचे. पक्षाला कट्टर वाद मान्य नाही, भाविष्यात देखील मान्य नाही असं देखील यावेळी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार, असं म्हणत विरोधक सातत्याने टीका करत आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, याचा विश्वास देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुरोगामी विचार प्रत्येक घरात पोहोचवण्याचं काम झालं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचा आहे.त्यासाठी आपली ताकद अजून वाढवावी लागेल. नवीन येणाऱ्याचे स्वागत करूच, जुन्यांनी विश्वस ठेवा, त्यांचाही चांगलं होईल, सगळ्यांना संधी दिली जाईल. राज्याचा विकास हाच, देशाचा विकास हाच राष्ट्रवादी पक्षाच्या अजेंड्यावर असेल, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
लोक सहभाग वाढला पाहिजे
ध्येय प्राप्तीसाठी सत्ता असणे महत्वाचे असते. येत्या काळात राष्ट्रवादीची कार्यालयं कार्यकर्त्यांनी जबजलेली पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्व आहे. पक्ष कार्यालयात गेलो तर काम होते, असा विश्वास निर्माण झाला तरच पक्ष आणि लोक सहभाग वाढेल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. मला 10 जून 1999 आठवतो. त्यावेळी जेष्ठ नेत्यांनी मिळून स्वाभिमानातून पक्षाची स्थापना केली होती. आपल्याला पूर्ण बहुमत मिळाले नाही. आतापर्यंत वर्धापन दिन मुंबई येथे व्हायचा. मात्र, यावेळी पुण्यात नंतर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तुमचा उत्साह पाहून मला वाटतं की, अधिक जोमाने काम केले पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
विचारांची लढाई
आपण फक्त बोलत नाही आपण करून दाखवतो. चुकीचं काम करणाऱ्याची, कामचुकारपणा करणाऱ्यांची हायगई केली जाणार नाही, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. जनतेच्या विश्वाला तडा जाऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देश पातळीवर लोककल्याणाचा विचार करून चालणारा पक्ष आहे. सत्ता येईन आणि जाईन पण सुधारणावादी विचार हा निरंतर चालत राहिला पाहिजे. सत्तेत नसलो तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू. ही लढाई विचारांची आहे आणि विचारांशी आहे, ती आपण लढत आहोत असं अजित पवार म्हणाले आहेत.
Disclaimer: आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.