Nitin Gadkari Lists Benefits Of Yearly Fastag Pass: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल कराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी FASTag वार्षिक पासची घोषणा केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून त्याबद्दल माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये लिहिले आहे की, सोईस्कर महामार्ग प्रवासाच्या दिशेने एक परिवर्तनीय पाऊल म्हणून आम्ही 15 ऑगस्ट 2025 पासून तीन हजार रूपये किमतीचा FASTag-आधारित वार्षिक पास सादर करत आहोत.
टोलसाठी आता वार्षिक पास
नितीन गडकरी यांनी सांगितले की, या पासची वैधता एक वर्ष किंवा 200 प्रवासांसाठी असेल, जे आधी असेल. हा पास विशेषतः कार, जीप आणि व्हॅन सारख्या गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी डिझाइन केला आहे. नवीन फास्टॅग पाससाठी तीन हजार रूपये द्यावे लागणार आहेत. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल. तो सक्रिय करण्यासाठी आणि नूतनीकरण करण्यासाठी लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप तसेच NHAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल,
नवीन वार्षिक फास्टॅग प्रणाली कधी सुरू होणार?
नितीन गडकरी (नितीन गडकरी टोल प्लॅन) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर घोषणा केली की नवीन FASTag आधारित वार्षिक पास 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत आहे. त्यांनी सांगितले की, हा पास सक्रिय झाल्यापासून एक वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी वैध असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वार्षिक पास कसा सक्रिय करायचा किंवा नूतनीकरण करायचा याबद्दल देखील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, लवकरच वार्षिक पास सक्रिय किंवा नूतनीकरण करण्यासाठी हायवे यात्रा अॅप आणि एनएचएआय किंवा एमओआरटीएच वेबसाइटवर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल. या लिंकच्या मदतीने वार्षिक फास्टॅग पास सक्रिय करता येईल. यामुळे प्रवासात सुलभता येणार असल्याचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय.
नवीन वार्षिक FASTag पास काय आहे?
किंमत: 3000 रूपये
वैधता: एक वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंग (जे आधी असेल ते)
लाभार्थी: वैयक्तिक वापराची वाहने – कार, जीप, व्हॅन
लागू: 15 ऑगस्ट 2025 पासून
प्लॅटफॉर्म: हायवे ट्रॅव्हल अॅप, NHAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाइट
वैध
• राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग (NE) चे टोल प्लाझा
-राज्य महामार्ग (SH) किंवा राज्य सरकारे किंवा स्थानिक संस्थांअंतर्गत इतर मार्गांवर
ही योजना का आणली गेली?
• वारंवार टोल भरण्याची समस्या
• दररोज टोल भरणाऱ्या लाखो खाजगी वाहनचालकांना दिलासा
• टोल वाद, वाहतूक कोंडी आणि अडथळे कमी होतील
• डिजिटल इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाच्या दिशेने एक मोठे पाऊल
कसे सक्रिय करावे आणि नूतनीकरण करावे?
अॅप: राजमार्ग यात्रा अॅप
वेबसाइट: nhai.gov.in, morth.nic.in
आवश्यक कागदपत्रे: वैध FASTag, वाहन नोंदणी क्रमांक, ओळख पडताळणी
काही महत्वाचे मुद्दे
7,000 रुपयांची बचत: गडकरी यांच्या मते, साधारणपणे जर एखाद्या व्यक्तीने वर्षातून 200 टोल ओलांडले तर त्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागतो. या योजनेमुळे, हा खर्च 3,000 रुपयांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे दरवर्षी सुमारे 7,000 रुपयांची थेट बचत होईल.
प्रति टोल सरासरी खर्च फक्त 15 रूपये: सध्या अनेक टोल प्लाझावर ₹50, ₹80 किंवा अगदी ₹100 द्यावे लागतात. परंतु या पास अंतर्गत प्रति टोल सरासरी खर्च फक्त ₹15 असेल.
वाहन न थांबवता टोल ओलांडणे: येणाऱ्या काळात टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे, न थांबता टोल ओलांडता येतील, ज्यामुळे वाहतूक आणि वेळ दोन्ही वाचतील.
सरकारचा हेतू : डिजिटल, परवडणारा आणि रहदारीमुक्त प्रवासभारतात FASTag आधीच अनिवार्य करण्यात आले आहे. आता ही वार्षिक पास योजना सरकारच्या डिजिटल-फर्स्ट टोलिंग धोरणाला आणखी बळकटी देईल. यामुळे टोल पेमेंटमध्ये पारदर्शकता तर येईलच, शिवाय वाहतूक कोंडी आणि वादही कमी होतील.
Disclaimer: ही योजना विशेषतः खाजगी चारचाकी वाहनांसाठी लागू असेल. या योजनेच्या घोषणेनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे.