Pune Station Name Change Controversy Know The History: मोदी सरकारनं देशातील महत्त्वाच्या शहरांच्या नामांतराचा धडाका लावला. यामध्ये महायुती सरकारची सुद्धा वर्णी लागली. राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या तीन जिल्ह्यांचं नामांतर झालंय. आता या यादीत पुण्याचंही नाव जोडलं जाऊ शकतं, अशी शक्यता आहे. पुणे शहराचं नाही तर पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी होत आहे. परंतु प्रश्न असा आहे की नाव काय द्यायचं? पुण्याच्या नामांतराची लढाई आता सुरू झालीय. पुण्यातील पुणे स्टेशनच्या नावावरून नवा राजकीय वाद सुरू झालाय. स्थानकाचे नाव थोरले बाजीराव यांच्या नावाने दिले पाहिजे, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यानंतर अनेकांनी या प्रकरणी उडी घेतली. पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ नाव देण्यात यावे, अशी मागणी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केल्याचं समजतंय.
नवीन वादग्रस्त प्रस्ताव – पुणे रेल्वे स्टेशन
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ‘थोरले बाजीराव पेशवा पुणे स्टेशन’ या नावासाठी प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी पुण्याला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहर दाखवण्याचा प्रयत्न करत शिवराज्याच्या वारशाशी जोडले. 1857 मध्ये Poona हे इंग्रजी नामांतरित रूप करण्यात आले. 1978 मध्ये प्रसंगी नाव अधिकृतपणे Pune करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर भारतात पारंपारिक नावांच्या पुनर्स्थापनेचा एक भाग पुणे शहर देखील आहे.
संभाजी ब्रिगेडने म्हटलंय की, या ऐतिहासिक नावाऐवजी फुलेंच्या नावावरून नाव द्या. संभाजी ब्रिगेड, आरपीआय, इतर गटांनी या स्थानकाला बाजीराव ऐवजी ‘क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले’ असं नाव द्यावं, असं आवाहन केलंय.तर सुरक्षेपेक्षा नाव बदलण्यापूर्वी स्टेशन सुधारण्याची गरज, असं मत वसंत मोरे यांनी मांडलं आहे. शरद पवार गटाचे अनुक्ष काकडे यांनी म्हटलंय की, बाजीराव ऐतिहासिक महत्त्व असले तरी, स्टेशनचे नाव ज्योतिबा फुले किंवा गोपालकृष्ण गोकुळे यांच्या नावाने होणं योग्य होईल. इतिहासकार कोकाटे यांनी “पुण्याची खरी स्थापनेची कथा म्हणजे राजमाता जिजाऊ यांच्या योगदानातून सुरू झालेली आहे, असं जाहीर केलं. त्यामुळे स्थानकाला नाव द्यायचं, तर द्यायचं कोणाचं? असा सवाल उपस्थित होतोय.
पुणे नावाच्या इतिहासाचा समृद्ध इतिहास
पुणे शहराच्या नावाचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि विविध आहे, तो अनेक शतकांत बदलत गेला. त्याचे संक्षिप्त विश्लेषण आपण पाहू या. सर्वात जुनी उल्लेखनीय नोंद ८ व्या शतकातील (७५८ आणि ७६८ ईसामध्ये) सातपत्रीत ताम्रपत्रांमध्ये आढळते. ज्यात शहराला “Punakā Vishaya” आणि “Punya Vishaya” म्हणून ओळखले गेले – या शब्दांचा अर्थ ‘पवित्र भूमी’ असा होतो.
‘विषय’ म्हणजे प्रांत किंवा प्रदेश, तर ‘पुण्य/पुणक’ म्हणजे पवित्रता. मध्ययुगीन काळ देखील पुण्याला विविध नावं दिली गेली होती. इतिहासकारांनी म्हटल्याप्रमाणे पुण्यका, पुण्यपूर, पुनाका देशा, पुण्य नगरी, पुण्य वाडी, पुनावाडी अशा नावांचा यात उल्लेख आहे. राजा, व्यापार, स्थानिक ऐतिहासिक घटना या सर्व कारणांमुळे या नावांची रूपं बदलत राहिली. आदिलशहा, मुघल आणि मराठा काळात देखील पुण्याचं नाव बदललं. मराठा काळात, शहाजी भोसले यांच्या आदेशानुसार पुणेला ‘कसबे पुणे’ म्हटले गेले. ‘कसबे’ म्हणजे बाजारपेठ व नागरी केंद्र . मुघल सम्राट औरंगझेबने १७०३–१७०५ या काळात पुण्यातील एका भागाचे नाव ‘मुहियाबाद’ असं नाव ठेवलं. परंतु, ते फक्त काही काळासाठीच टिकले, सम्राटाच्या मृत्यूनंतर लगेच नामांतर परत घेतले गेले.
ब्रिटिश काळ : Poona
१८५७ मध्ये इंग्रजांनी शहराचे नाव इंग्रजीत पूना असे लिहिले. पुणे या नावाखाली इंग्रजांनी कॅन्टोन्मेंट तयार केले; शहराला ‘Queen of the Deccan’ असे संबोधले गेले. १८७०–१८८० च्या दशकात येथे बॅडमिंटनचे नियम तयार झाले. मशहूर Poona Club सारखी संस्था स्थापन झाली. स्वातंत्र्यानंतरही काही काळ पूना नाव वापरले गेले. पण १९७८ मध्ये, शहराचे नाव अधिकृतपणे Pune असे पुनःस्थापित झाले. त्यानंतर आता पुन्हा पुण्याच्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी होत आहे.
पुढे काय होणार?
पुणे स्टेशनच्या एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर एक पाटी लागलेली आहे. या पाटीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर यांच्या सन्मानार्थ ही पाटी लावण्यात आल्याची माहिती मिळतेय. भारत पाकिस्तानच्या 1965 च्या युद्धातलेफ्टनंट कर्नल तारापोर यांना वीरमरण आलं. त्यांच्या स्मरणार्थ ही पाटी पुणे स्टेशन येथे लावण्यात आलेली आहे. एकीकडे पुणे स्टेशनच्या नावावरून राजकारण रंगतंय तर दुसरीकडे भारतासाठी वीरमरण पत्करलेल्या या नावांचा देखील विचार करणे महत्वाचं आहे
अंतिम निर्णय केंद्राच्या रेल्वे मंत्रालयावर अवलंबून आहे. भविष्यात रेल्वे स्टेशनचं नाव कायम बदललं गेलं, तर पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
शहरात नाव बदलांचा इतिहास आपल्या अनेक प्रश्नांना उजागर करतो. खऱ्या बदलासाठी शासन, इतिहास, समाज आणि राजकीय सहमती कशी साधता येईल? नामांतर हा सांस्कृतिक पुनरुत्थानाचा मार्ग तर नाहीच, परंतु तडजोड, विरोध, समाजाचे दृष्टिकोन, राजकीय स्वार्थ यात गुंतले आहेत.
Pune Name Controversy: सध्या महाराष्ट्रात नामांतराची लढाई सुरू आहे. धाराशिव, अहिल्यानगरनंतर आता पुणे शहराच्या रेल्वे स्थानकाची चर्चा सुरू आहे. आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या. सध्या महाराष्ट्रात नामांतराची लढाई सुरू आहे. धाराशिव, अहिल्यानगरनंतर आता पुणे शहराच्या रेल्वे स्थानकाची चर्चा सुरू आहे. आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.