jennifer allen Ai Story : एआय करतय कर्ज (AI loan) फेडण्यातही मदत करतंय
The miracle of AI : एआय (AI) संशोधन करत आहे, डिझाइन बनवत आहे, पारंपारिक कामे अधिक कार्यक्षमतेने करण्यास मदत करत आहे. इतकंच काय तर, एआय कर्ज (AI loan) फेडण्यातही मदत करतंय. विश्वास बसत नाही ना, तर मग ही घटना नक्की वाचा.
Jennifer Allen Pay Debt With The Help Of Chatgpt : AI म्हणजे केवळ चॅटबॉट नाही…तर आता हे तंत्रज्ञान तुमचं कर्जही फेडायला मदत करतंय. होय, हे खरंय! एका महिलेने AI च्या मदतीने तब्बल 20 लाखांचं कर्ज फेडलं. ही आहे, जेनिफर एलन. अमेरिकेतील डेलावेअरमध्ये राहणारी एक सामान्य गृहिणी आणि रिअल इस्टेट एजंट. तिच्या डोक्यावर 23,000 डॉलर म्हणजेच जवळपास 19.6 लाख रुपयांचं कर्ज होतं. मुलीचा जन्म, वैद्यकीय खर्च, पालकत्वाच्या जबाबदाऱ्या आणि अनियोजित आर्थिक सवयी. सगळं काही गडबडलं. जेनिफर कर्जाच्या चक्रव्यूहात अडकली…आणि मग तिनं घेतला ChatGPT चा आधार. तिनं ठरवलं..दररोज एक सल्ला AI कडून घ्यायचा आणि त्यानुसार खर्चाचं नियोजन करायचं. तिनं अनावश्यक सब्स्क्रिप्शन रद्द केली, घरात स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि दरमहा 50,000 रुपयांची बचत करू लागली. जुन्या ब्रोकरेज खात्यातून तिला सापडले 8.5 लाख रुपये. फक्त एका महिन्यात तिनं फेडलं 10.3 लाखांचं कर्ज. तिच्या एकूण कर्जापैकी अर्धी रक्कम फक्त AI च्या मदतीनं संपवली. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एआय केवळ माहिती संशोधन, डिझाईन किंवा कंटेंट निर्मितीपुरतं मर्यादित न राहता आता आर्थिक नियोजनासाठीही उपयुक्त ठरू लागला आहे. आश्चर्य वाटेल, पण एका महिलेनं एआयच्या मदतीनं तिच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात केली आहे. एवढंच नव्हे तर तिनं लाखो रुपयांचं कर्जही फेडलं आहे. हे उदाहरण अमेरिकेतील एका महिलेनं घडवून आणलं आहे.
जेनेफरची नक्की स्टोरी काय?
अमेरिकेतील डेलावेअरमध्ये राहणारी 35 वर्षीय जेनिफर एलन ही रिअल इस्टेट एजंट आणि कंटेंट क्रिएटर आहे. तिच्यावर एकूण 23,000 डॉलर्स (सुमारे 19.6 लाख रुपये) एवढं क्रेडिट कार्डचं कर्ज होतं. तिचं उत्पन्न चांगलं असूनही आर्थिक नियोजनाची योग्य माहिती नसल्यामुळे ती कर्जाच्या जाळ्यात अडकत गेली. तिच्या मुलीच्या जन्मानंतर वाढलेले वैद्यकीय खर्च आणि पालकत्वाची जबाबदारी यामुळे तिला क्रेडिट कार्डचा अवलंब करावा लागला. सुरुवातीला गोष्टी नियंत्रणात होत्या, पण नंतर तिला जाणवलं की कर्ज वाढत चाललं आहे.
याच परिस्थितीत जेनिफरने चॅटजीपीटी या एआय टूलचा आधार घेतला. तिनं 30 दिवसांसाठी एक प्रयोग केला. दररोज चॅटजीपीटीकडून एक सल्ला घेऊन त्या आधारे खर्च आणि बचतीचं नियोजन करणं. यामध्ये तिनं अनावश्यक सब्स्क्रिप्शन बंद केली, वायफळ खर्च टाळले, आणि आपले आर्थिक अॅप्स व बँक खाती तपासली. यामध्येच तिला जुन्या ब्रोकरेज खात्यात, काही अनवट पेड अॅप्समध्ये आणि गुंतवणुकीत एकूण 10,000 डॉलर म्हणजेच सुमारे 8.5 लाख रुपये अशी काही रक्कम मिळाली जी, तिच्या लक्षातही आली नव्हती.
जेनिफरनं चॅटजीपीटीच्या मार्गदर्शनानं घरीच जेवण बनवणं सुरू केलं आणि बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण आणलं. यामुळे तिला महिन्याला जवळपास 50,000 रुपयांची बचत होऊ लागली. या एका महिन्याच्या आर्थिक आव्हानात तिनं तब्बल 12,000 डॉलर (जवळपास 10.3 लाख रुपये) इतकं कर्ज फेडून टाकलं. म्हणजेच एकट्या एका महिन्यात ती तिच्या एकूण कर्जाच्या अर्ध्या रकमेपासून मुक्त झाली.
एआयमुळं आपलं जीवन सोपं
या घटनेवरून एक गोष्ट निश्चित आहे. योग्य मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर केल्यास कोणतीही अडचण दूर करता येऊ शकते. जेनिफरने दाखवून दिलं की, एआयचा उपयोग केवळ टेक्निकल कामासाठीच नाही, तर वैयक्तिक जीवनाच्या व्यवस्थापनासाठीही होऊ शकतो. आर्थिक नियोजनात गोंधळलेल्या अनेकांसाठी ही प्रेरणादायक गोष्ट ठरू शकते. स्मार्ट प्लॅनिंग, टेक्नॉलॉजी आणि जिद्द यांची ही जबरदस्त कॉम्बिनेशन. AI योग्य वापरलं, तर ते आयुष्यही बदलू शकतं. तुम्ही तयार आहे का, तुमच्या आर्थिक व्यवस्थापनात AI आणायला? एआयमुळे आपले दैनंदिन जीवन अधिक सोपं, वेगवान आणि नियोजित झालं आहे. आर्थिक नियोजन, आरोग्य निगा, शिक्षण, वाहतूक आणि ग्राहक सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. घरबसल्या बँकिंग, वैद्यकीय सल्ला, कामाचे स्वयंचलन, वेळेची बचत आणि अचूक निर्णय घेण्यात एआय मदत करत आहे. एकटेपणा, गोंधळ आणि गैरसमज दूर करून एआय आपल्या आयुष्याला दिशा देत आहे. योग्य वापर केल्यास एआय हे जीवन सुधारण्याचं प्रभावी साधन ठरतं. म्हणूनच म्हणता येईल – एआयमुळे जीवन अधिक सुरळीत, सुलभ आणि सक्षम झालं आहे.
discription : अमेरिकेतील डेलावेअरमध्ये राहणाऱ्या जेनिफर एलन हिने दाखवून दिलं की एआय (AI) म्हणजे फक्त चॅटबॉट किंवा टेक्नॉलॉजी नाही, तर ते आयुष्य बदलण्याचं एक साधन आहे. तिच्यावर तब्बल 23,000 डॉलर (सुमारे 19.6 लाख रुपये) इतकं कर्ज होतं. वैद्यकीय खर्च, मुलीची जबाबदारी आणि चुकीच्या आर्थिक सवयींमुळे ती कर्जाच्या चक्रव्यूहात अडकली होती. पण तिनं ठरवलं की दररोज ChatGPT कडून एक सल्ला घ्यायचा आणि त्यानुसार खर्च व बचत नियोजन करायचं.
फक्त एका महिन्यात जेनिफरनं 10.3 लाखांचं कर्ज फेडलं. सब्स्क्रिप्शन बंद केली, घरात जेवण बनवायला सुरुवात केली, जुन्या खात्यातले पैसे शोधले आणि महिन्याला जवळपास 50,000 रुपयांची बचत करू लागली.
ही कहाणी दाखवते की योग्य वापर केल्यास एआयमुळे आर्थिक अडचणींवर मात करून जीवन अधिक सोपं, सक्षम आणि नियोजित करता येऊ शकतं.