Barshi Shooting Case : सासुरे गावातील प्रेमसंबंधातून झालेल्या गोळीबारात तरुणाची मृत्यू | Solapur Crime News

barshi-shooting-case : बार्शी तालुक्यातील सासुरे गावात प्रेमसंबंधातून तरुणाने स्वतःवर गोळी घेतली झाडून ; पोलिसांचा तपास सुरू (Solapur Crime News)

barshi-shooting-case : सोलापूर जिल्हातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात अंत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सासुरे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका तरुणाने गोळ्या झाडून स्वतः ला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.. (Solapur Crime News) मृत तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी तसेच घटनास्थळी सापडलेल्या शस्त्रामुळे तपासणीचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता या तरुणाची आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थीत होत आहे. तसेच ही घटना प्रेमसंबंधातील वादातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

नेमकं काय घडलं ?

barshi-shooting-case : आज सकाळी बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी होती. कार पूर्णपणे लॉक करण्यात आलेली होती.. सकाळी उठल्यावर गावातील लोकांना लाल कार दिसली.. ती बराच वेळ बंद अवस्थेत असल्याने नागरीकांना शंका येयला लागली.. कारमध्ये कोणी आहे का हे पाहण्यासाठी गावकरी कार जवळ गेले, तेव्हा आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेली असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर गावकऱ्यांची गाडी जवळ गर्दी जमली.. गावकर्यांनी गावातील पोलीस पाटलाला या घटने संदर्भात माहीती देत घटनास्थळी बोलवून घेतलं. पोलीस पाटलांनी तात्काळ ही माहीती पोलीस स्टेशनला कळवली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख गोविंद जगन्नाथ बरगे राहणार मसला, तालूका. गेवराई, जिल्हा. बीड अशी पटली. बीडच्या लुखमसला येथील तो तरुण उद्योजक आहे. चौकशीत समोर आले की, गोविंद बरगे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता. या वादातूनच ही घटना घडली असावी अशी शंका निर्माण झाली.

नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली.आत गोविंद बरगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या. त्यातून रक्त वाहत होतं. गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट लक्षात येत होतं. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला.

या प्रकरणाचा तपास आता एपीआय जगदाळे करीत आहेत. पिस्तुलावरील परवाना आहे की नाही, याची तपासणी देखाली सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची आणि गायकवाड कुटुंबीयांची चौकशी केली आहे. प्रेमसंबंध तुटल्याने झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असला तरी इतर सर्व शक्यतांवरून तपास करण्यात येतोय.

www.youtube.com/@LokswarajyaLive

पोलीसांकडून घटनेचा तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी घटनास्थळी दाखल झाले… त्यांनी या घटनेचा तपास करत इतर पोलीस अधिकाऱ्यांना तपासाचे मार्गदर्शन केले. डीवायएसपी अशोक सायकर यांच्या अंदाजानूसार, ही घटना “प्रेमसंबंधातील वादामुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे; मात्र आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल.” असं विश्वास त्यांनी नातेवाईकांना दिला.

सध्या या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. बार्शी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.. घटनेचे सत्य समोर येताचं आरोपीना अटक केली जाईल असं पोलीसांनी सांगितलं त्यानंतर अशोक सायकर (उपविभागीय पोलीस अधिकारी,बार्शी) यांनी या प्रकरणासंबंधी प्रतिक्रीया दिली आहे.

barshi-shooting-case : (Discription) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोविंद जगन्नाथ बरगे हा तरुण लॉक केलेल्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोळ्या-कानाजवळ गोळ्यांच्या जखमा होत्या आणि कारजवळ पिस्तूलही आढळले. प्राथमिक तपासात ही घटना प्रेमसंबंधातील वादातून घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृत तरुणाचा प्रशांत गायकवाड यांच्या बहिणीसोबत दीड-दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होता. या नात्यात बिघाड झाल्यानंतर वाद वाढले आणि अखेर ही घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जातो. पोलिसांनी आत्महत्या की हत्या यावर सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून लवकरच सत्य समोर येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

barshi-shooting-case : (Disclaimer) (अस्वीकरण)

ही बातमी उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहिती, स्थानिक नागरिकांचे निवेदन आणि पोलिसांकडून मिळालेल्या अहवालांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यातील तपशील तपास पूर्ण होईपर्यंत बदलू शकतात. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती दोषी आहेत की निर्दोष, याचा निर्णय घेण्याचा एकमेव अधिकार न्यायालयीन यंत्रणेकडे आहे. त्यामुळे या बातमीत नमूद केलेल्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा कुटुंबावरील आरोप हे केवळ प्राथमिक स्वरूपाचे असून, त्यांना अंतिम सत्य मानता येणार नाही.

वाचकांनी ही माहिती फक्त वृत्तस्वरूपात स्वीकारावी आणि यावर आधारित कोणताही वैयक्तिक निष्कर्ष किंवा पूर्वग्रह तयार करू नये. आम्ही कोणत्याही प्रकारे अफवा, चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारे विधान पसरवण्याचा हेतू बाळगत नाही. या घटनेविषयीची अधिकृत व कायदेशीर माहिती फक्त संबंधित तपास यंत्रणा आणि न्यायालय यांच्या माध्यमातूनच निश्चित होईल.

whatsapp.com/channel/0029VbArXcdFcowCtuJrcH1D

Leave a Comment