Two Brothers Built Government school by spending Rs 15 crores : तुम्ही खाली फोटोमध्ये जी इमारत पाहिली, ती कोणत्याही व्हिआयपी व्यक्तीचा बंगला नाही. तर ही एक सरकारी शाळा आहे. होय…एक सरकारी शाळी. जी दोन सख्ख्या जी दोन भावांनी स्वतःच्या खिशातले 15 कोटी खर्च करत आपल्याच गावात बांधली आहे. आता तुम्ही प्रश्न पडतोय ना की, हे भाऊ नक्की कोण आहेत? ही शाळा कुठे आहे, तर मग हा लेख शेवटपर्यंत वाचा.
ही कहाणी आहे दोन भावांची. त्यांची नावे मेघराज आणि अजित धाकड आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने गावातील एका सरकारी शाळेचे चित्र बदलले आहे. या दोन भावांनी ही शाळा इतकी भव्य बनवली आहे की, ती दूरवरून पंचतारांकित हॉटेलसारखी दिसते. या शाळेच्या नूतनीकरणासाठी भावांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. ही शाळा राजस्थान राज्यातील सिसोदा गावात आहे.
शाळा कुठे आहे?
सिसोदा गाव राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात आहे. हे गाव नाथद्वारा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. हे गाव सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. कारण येथे बांधलेली एक भव्य सरकारी शाळेची इमारत आहे, ती एखाद्या आलिशान पंचतारांकित हॉटेलसारखी दिसते. आधुनिक सुविधांनी युक्त तीन मजली शाळेची इमारत लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या इमारतीच्या भव्यतेमागील कारण म्हणजे गावातील दोन भाऊ. त्यांची नावे मेघराज धाकड आणि अजित धाकड आहेत.
मेघराज धाकड आणि अजित धाकड यांनी त्यांच्या गावातील मुलांना चांगले शिक्षण आणि वातावरण देण्याचे स्वप्न पाहिले होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भांडवलातून सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून ही भव्य सरकारी शाळेची इमारत बांधली. हे दोन्ही भाऊही याच शाळेत शिकले. प्राथमिक शिक्षण त्यांनी याच शाळेतून घेतलं होतं. पुढे ते व्यवसायासाठी मुंबईला गेले. परंतु मुंबईवरून जेव्हा मेघराज गावात आला, तेव्हा त्याला शाळेची अवस्था खूपच वाईट झाली असल्याचं दिसलं. मुलांसाठी पुरेशा सुविधा नव्हत्या… अभ्यासाचे वातावरण प्रेरणादायी नव्हते. मग त्याने ठरवले की, तो त्याच्या गावासाठी काहीतरी नक्की करणार.
तीन मजली इमारतीत 40 खोल्या
याच विचारातून त्याने शाळेची भव्य अशी तीन मजली इमारत बांधली. या शाळेच्या तीन मजली इमारतीत 40 खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यामध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि शिक्षक कक्ष यांचा समावेश आहे. इमारतीची रचना आणि सुविधा कोणत्याही खाजगी आंतरराष्ट्रीय शाळेपेक्षा कमी नाहीत. कॅम्पसमध्ये हिरवळ, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आलंय. मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र मैदाने बनवण्यात आली आहेत. संपूर्ण कॅम्पस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुरक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रतिभेला चालना देण्यासाठी व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल कोर्ट देखील बांधण्यात आले आहेत. इंटरलॉकिंग मार्ग, मजबूत सीमा भिंती आणि हिरवेगार अंगण हे एक आदर्श शैक्षणिक कॅम्पस बनवते.
सिसोदा गावातील दोन भावांचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक उदाहरण बनला आहे, जर समाजातील लोकांनी शिक्षणाबाबत गांभीर्यता घेतली, तर सरकारी संस्था देखील उत्कृष्ट बनवता येतात. मेघराज धाकड आणि अजित धाकड हे दोघेही भाऊ सामाजिक कार्यकर्ते आहेत. गावकरी या भावांचे कौतुक करताना थकत नाहीत. या उपक्रमामुळे गावातील मुलांना शहराकडे जावे लागणार नाही.
शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारी बातमी
राजस्थानमधील सरकारी शाळांचे चित्र आता बदलतंय. याचं उत्तम उदाहरण ठरली राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा परिसरातील शिशोदा गावातील एक सरकारी उच्च माध्यमिक शाळा. ही शाळा आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुमारे सहा वर्षे चालले होते. यावेळी कामाची गुणवत्ता आणि सुविधांमध्ये कोणतीही तडजोड केली गेली नाही. परिसरातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. प्रत्येक मुलांना समान संधी मिळाव्यात, अशीच या धाकड भावंडाची इच्छा आहे.
ही कहाणी केवळ ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारी नाही, तर हे देखील सिद्ध करते की जर हेतू चांगला असेल आणि मातृभूमीवर प्रेम असेल तर कोणत्याही पातळीवर बदल शक्य आहे.
Disclaimer : दोन भावांनी 15 कोटी रूपये खर्च करून आपल्या गावात सरकारी शाळा उभी केली आहे. ही शाळा राजस्थानमध्ये आहे. आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.