Chhath Puja 2025 : 25 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सणात काय-काय करतात, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
Disclaimer : (Chhath Puja 2025) दिवाळीच्या सहाव्या दिवशी साजरा होणारा छठ महापर्व हा सूर्यदेव आणि छठी मैय्यांच्या उपासनेचा सण आहे.25 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सणात काय-काय करतात, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
Chhath Puja 2025 Know In Detailed : भारत हा सण-उत्सवांचा देश आहे. इथे प्रत्येक सणामागे श्रद्धा, परंपरा आणि पौराणिकता दडलेली आहे. दिवाळी संपताच देशाच्या पूर्व भागात आणखी एक मोठा आणि पवित्र सण सुरू होतो — छठ महापर्व. 2025 साली छठ पूजेची सुरुवात 25 ऑक्टोबरपासून होणार आहे. हा सण दिवाळीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा केला जातो. या चार दिवसांच्या व्रतामध्ये स्त्रिया विशेषतः विवाहित महिला या सूर्यदेव आणि छठी मैय्या यांची उपासना करतात. Chhath Puja 2025 हा सण केवळ श्रद्धेचा नाही, तर स्त्रीशक्ती, मातृत्व आणि निसर्गाशी जोडलेलं एक गूढ नातं उलगडणारा आहे. छठी मैय्या कोण आहेत, सूर्यदेवाची पूजा का केली जाते? भारतात हा सण कुठे-कुठे साजरा होतो? चला, जाणून घेऊया .
छठी मैय्या कोण आहेत?
मार्कंडेय पुराणात सृष्टीच्या निर्मितीविषयी सांगताना देवी प्रकृतीचे सहा भाग केले गेले, असं वर्णन आहे. त्या सहा भागांपैकी सहावा भाग सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्या स्वरूपाला “छठी मैय्या” असं संबोधलं जातं. छठी मैय्या या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्री असल्याचंही वर्णन आढळतं. Chhath Puja 2025 त्या सर्व मातृदेवींमध्ये अग्रगण्य, म्हणजेच बालकांचं रक्षण करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. लोकविश्वासानुसार, एखादं मूल जन्मल्यानंतर पहिले सहा महिने छठी मैय्या त्या बालकाच्या रक्षणासाठी त्याच्याजवळ राहतात. त्यामुळेच मातांना आपल्या लेकरांच्या आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखासाठी या देवतेची विशेष पूजा करायची प्रथा आहे.
सूर्यदेव आणि छठी मैय्यांची पूजा का केली जाते?
पौराणिक मान्यतेनुसार, छठी मैय्या या सूर्यदेवाच्या बहिण मानल्या जातात. म्हणूनच छठ पर्वात सूर्योपासना आणि छठी मैय्यांची पूजा एकत्र केली जाते. Chhath Puja 2025 सूर्य हा जीवन, ऊर्जा आणि आरोग्याचा अधिपती मानला जातो. त्याचं उदय आणि अस्त या दोन्ही क्षणांत म्हणजेच अर्घ्यदानाच्या वेळी भक्त सूर्याला नमस्कार करून छठी मैय्याचं स्मरण करतात.
- पहिला अर्घ्य सायंकाळच्या अस्त होताना सूर्याला दिला जातो, ज्याला संध्याअर्घ्य म्हणतात.
- दुसरा अर्घ्य पहाटेच्या सूर्योदयाच्या वेळी दिला जातो, ज्याला उषाअर्घ्य म्हणतात.
- या वेळी भक्त आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि अपत्यप्राप्तीची प्रार्थना करतात.
छठी मैय्या आणि सूर्योपासनेच्या कथा
छठ महापर्वाशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. Chhath Puja 2025 त्यातील दोन अत्यंत लोकप्रिय कथा पुढीलप्रमाणे आहेत:
- राजा प्रियंवद आणि देवी षष्ठीची कथा
मार्कंडेय पुराणातील कथेनुसार, राजा प्रियंवद आणि त्यांची पत्नी मालिनी यांना संतती नव्हती. त्यानंतर महर्षी कश्यपांनी पुत्रेष्टी यज्ञ करून राणीला यज्ञाहुतीची खीर दिली. त्यातून त्यांना कन्या झाली, पण ती मृत जन्मली. दुःखाने राजा प्राण त्यागण्याच्या तयारीत असतानाच देवी षष्ठी (छठी मैय्या) प्रकट झाल्या. Chhath Puja 2025 त्यांनी सांगितले की, “हे राजन, तू माझी पूजा कर. मग तुला संतानप्राप्ती होईल.”
राजाने व्रत केलं आणि देवी प्रसन्न झाल्या. त्यांना जिवंत पुत्र झाला. त्या दिवसापासून संतानसुख आणि बालकल्याणासाठी छठ व्रत करण्याची परंपरा सुरू झाली.
- द्रौपदी आणि पांडवांची कथा
दुसरी कथा महाभारतातील आहे. पांडवांनी आपलं राज्य गमावल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला छठ व्रत करण्याचा सल्ला दिला. द्रौपदीने पूर्ण श्रद्धेने व्रत केलं आणि छठी मैय्या प्रसन्न झाल्या. Chhath Puja 2025लवकरच पांडवांना आपलं राज्य परत मिळालं. तेव्हापासून मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील हे व्रत केलं जातं.
- छठ पूजेची प्रक्रिया
छठ पूजेचा कालावधी चार दिवसांचा असतो आणि तो अत्यंत कठोर नियमांनी पाळला जातो.
- पहिला दिवस (नहाय-खाय) – उपासक गंगाजळ किंवा नदीत स्नान करून शुद्ध आहार घेतात.
- दुसरा दिवस (खरना) – संध्याकाळी गूळ-खीर आणि रोटीचा नैवेद्य करून उपवास सुरू होतो.
- तिसरा दिवस (संध्याअर्घ्य) – नदीकाठी सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जातं.
- चौथा दिवस (उषाअर्घ्य) – सूर्योदयाला पुन्हा अर्घ्य देऊन व्रत पूर्ण केलं जातं.
या दरम्यान स्त्रिया जलाशयाच्या काठी उपवास करत रात्र जागतात. भक्त नदीकाठावर मातीचे दीप लावतात, पारंपरिक गीते गातात आणि सूर्यदेव व छठी मैय्यांचं स्मरण करतात.
भारतातील कोणत्या राज्यांत छठ सण साजरा होतो?
छठ पूजेला उत्तर भारतातील सर्वात पवित्र सणांपैकी एक मानलं जातं. जरी हा सण बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशाचा मूळ आहे, तरी आता तो संपूर्ण भारतात आणि परदेशातील भारतीय समुदायातही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
बिहार: छठ पूजा ही इथली सर्वात मोठी धार्मिक परंपरा आहे. पटना, गया, भागलपूर, मुजफ्फरपूर येथे गंगेच्या किनाऱ्यावर लाखो भाविक एकत्र येतात.
उत्तर प्रदेश: वाराणसी, गोरखपूर, बलिया आणि लखनऊ येथे विशेष घाट सजवले जातात.
झारखंड: रांची आणि धनबाद येथेही छठीच्या घाटांवर भक्तांची गर्दी असते.
दिल्ली आणि मुंबई: स्थलांतरित बिहार-यूपी समुदायामुळे या शहरांतही याची मोठी उत्साहवर्द्धक साजरी केली जाते. यमुना घाट, चौपाटी आणि तलाव परिसरात विशेष आयोजन केलं जातं.
नेपाळ: भारताच्या सीमावर्ती प्रदेशात असणारा हा सण नेपाळमधील तराई भागातही तितकाच लोकप्रिय आहे.
अधिक माहितीसाठी- www.youtube.com/@LokswarajyaLive
छठ पूजेचं आध्यात्मिक महत्त्व
छठ पूजा ही केवळ धार्मिक विधी नाही, तर निसर्ग, सूर्यप्रकाश आणि आरोग्याशी जोडलेली एक जीवनपद्धती आहे. सूर्यप्रकाशातील उर्जा आणि जलतत्वाचं संतुलन यामुळे मानवी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. स्त्रियांच्या कठोर उपवासामुळे संयम, आत्मबल आणि कुटुंबाबद्दलची निःस्वार्थ भावना प्रकट होते. छठी मैय्या आणि सूर्यदेव यांची संयुक्त पूजा ही प्रकृती, मातृत्व आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. 25 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणारा हा पवित्र सण लाखो भक्तांसाठी श्रद्धा, समर्पण आणि नव्या आशेचा किरण घेऊन येणार आहे.