Maharastra local body election : महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका नुकत्याच उत्साहात पार पडल्या असल्या तरी, मतदारांनी मतपेटीत दिलेला ‘कौल’ आता तातडीने उघड होणार नाही. या निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजे बुधवारी जाहीर होणार होते, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संपूर्ण प्रक्रियेत सकारात्मक हस्तक्षेप करत निकालाला स्थगिती दिली आहे. (Maharastra local body election)
‘या’ तारखेपर्यंत ‘सील’बंद राहणार – (Maharastra local body election)
न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्देशामुळे, निवडणुकीच्या रिंगणातील सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ‘सील’बंद राहणार आहे.
नागपूर खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, राज्यामध्ये मतमोजणी आणि निकाल आता थेट २१ डिसेंबर रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील. न्यायालयाने केवळ निकालाची तारीख पुढे ढकलली नाही, तर या कालावधीत एक्झिट पोल देखील जाहीर करण्यास सक्त मनाई केली आहे. विशेषतः, निकालाच्या तारखेपर्यंत म्हणजे २१ डिसेंबरपर्यंत संबंधित नगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता जैसे थे ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे मतदारांनी दिलेला जनादेश सुरक्षित असला तरी, निकाल लांबणीवर पडल्यामुळे उमेदवारांच्या गोटात उत्कंठा आणि धाकधूक यांचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे.