Actress Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest: मनोरंजन क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘कांटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक शेफाली जरीवाला आता आपल्यात नाही. वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्री शेफाली जरिवालाचं निधन झालंय. शेफालीच्या अचानक निधनाने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील तारेही शोकमग्न आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी सर्वांचे डोळे पाणावले आहेत, त्यांचं मन जड झालंय.
शेफालीचा मृत्यू कसा झाला?
रिपोर्ट्सनुसार शेफालीला हृदयविकाराचा झटका आला होता. तिचे पती आणि अभिनेता पराग त्यागी तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेले. पण ती रुग्णालयात पोहोचेपर्यंत शेफालीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एक काळ असा होता, जेव्हा ‘कांटा लगा ‘ हे गाणे सर्वत्र ऐकू येत असे. या गाण्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला चाहत्यांना खूप आवडली होती. या अभिनेत्रीचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालंय. (Actress Shefali Jariwala Death) तिने मुंबईत अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचं सांगितलं जातंय.
शेफाली जरीवालाचा हृदयविकारामुळे मृत्यू ही पहिलीच घटना नाही. त्यामुळे अनेक कलाकारांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकांना वाटते की, हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका एकच आहे. हृदयविकार किती धोकादायक आहे. त्याची जोखीम घटक काय आहेत? (Actress Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest) हे आपण जाणून घेऊ या.
हृदयाचे ठोके अचानक थांबले की, कार्डियाक अरेस्ट येतो. या परिस्थितीत आपले हृदय शरीरात रक्त पंप करणे थांबवते. यामुळे, एखादी व्यक्ती काही मिनिटांत बेशुद्ध होऊ शकते आणि श्वास घेणे थांबवू शकते. (Actress Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest) या स्थितीत, जर रुग्णाला ताबडतोब सीपीआर किंवा डिफिब्रिलेटरचा धक्का दिला नाही तर मृत्यू होऊ शकतो.
हृदयविकाराच्या झटक्याची कारणे कोणती?
- जेव्हा हृदयाच्या धमन्या ब्लॉक होतात.
- ज्यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांनाही जास्त धोका
- हृदयाच्या स्नायूंमध्ये आजार
- उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉल
- जन्मापासूनच हृदयरोग असणे
- विजेचा धक्का बसणे
- ड्रग्ज किंवा अल्कोहोलचा जास्त वापर
- पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता
- खूप जास्त ताण किंवा भीती
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक?
कार्डियाक अरेस्टमध्ये, हृदयाचे ठोके अचानक थांबतात. जेव्हा असे होते तेव्हा अचानक बेशुद्ध होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके थांबणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेकमध्ये अडथळा येणे अशी अनेक कारणे आहेत. त्याची लक्षणे छातीत दुखणे, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत.
कोणती काळजी घ्यायची?
- वेळोवेळी तुमचे हृदय तपासा.
- उच्च रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवा
- धूम्रपान आणि दारूपासून दूर रहा
- निरोगी आहार घ्या
- व्यायाम करा
शेफाली इंडस्ट्रीतून गायब (Actress Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest)
शेफाली जरीवाला 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला कांता लगा या रिमिक्स व्हिडिओने लोकप्रिय झाली. ज्यामुळे तिला ‘कांता लगा गर्ल’ हे टोपणनाव मिळाले. नंतर तिने सलमान खानच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात काम केले आणि नच बलिए आणि बिग बॉस 13 सारख्या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला. शेफाली मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसली नाही. पण सलमान खान आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील ‘कांटा लगा’ या गाण्याने तिला एका रात्रीत स्टार बनवले. शेफाली जरीवालाने नंतर काही म्युझिक व्हिडिओ केले. त्यानंतर ती पराग त्यागीसोबत नच बलिये 5 मध्ये दिसली. ती शेवटची बिग बॉस 13 मध्ये दिसली होती. (Actress Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest) शेफाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असायची.
जेव्हा शेफाली जरीवालाला ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातील ‘कांटा लगा’ हे गाणे मिळाले, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला ते गाण्याची परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी शेफाली कॉलेजमध्ये होती. तिच्या पालकांना तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे वाटत होते. पण शेफालीने तिच्या वडिलांचे ऐकले नाही. सलमान खानच्या चित्रपटासाठी गाण्यास तयार झाली. शेफाली जरीवालाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की तिला ‘कांटा लगा’ या व्हिडिओ गाण्यासाठी सात हजार रुपये मिळाले होते. ‘कांटा लगा’ हे गाणे हिट झाल्यानंतर, शेफाली इंडस्ट्रीतून गायब झाली. (Actress Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest)
whatsapp.com/channel/0029VbArXcdFcowCtuJrcH1D
Disclaimer: बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालंय. तिच्या मृत्यूमागे कार्डियाक अरेस्ट असल्याचं सांगितलं जातंय. हा आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे कोणती आहेत, ते आपण जाणून घेऊ या.