शेतीसाठी एआय ठरणार गेमचेंजर! वॉर रूम आणि एआय तंत्रज्ञान…शेतकरी होणार मालामाल

शेतीसाठी एआय ठरणार गेमचेंजर! वॉर रूम आणि एआय तंत्रज्ञान…शेतकरी होणार मालामाल

Agriculture Artificial Intelligence In Sugarcane Farming : आजच्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयचा वापर केला जातोय. एआयच्या मदतीने काम पूर्वीपेक्षा सोपं झालंय. कृषी क्षेत्रात देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे. त्यांना आर्थिक फायदा तर मिळतोच शिवाय कमी खर्चात चांगल्या उत्पादनाची हमी सुद्धा मिळत आहे. बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चर ट्रस्टने मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक दिग्गज कंपनीच्या सहकार्याने हे सिद्ध करून दाखवलं आहे.

बारामती कृषी विकास ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी एआय वापरून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे ऊस शेती विकसित केली आहे. हा प्रयोग सुमारे एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात उसावर करण्यात आला. त्याचे चांगले आणि फायदेशीर परिणाम मिळाले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत सुधारणा

ऊस शेतीत उत्पादकता वाढवण्याचा आणि खर्च कमी करण्याचा एक प्रयोग कृषी विकास ट्रस्टने केलाय. यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. बारामतीमध्ये हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला आहे. पारंपारिक शेतीमध्ये अनेकदा पाण्याची समस्या उद्भवते. पाण्याचा जास्त वापर आणि रासायनिक खतांचा वापर जमिनीची सुपीकता कमी करतो, ज्यामुळे उत्पादकता सुधारता येत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे ऊस शेतीत ही समस्या सोडवता येते.

वॉर रूम आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर: कृषी विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे. जिथे सर्व शेतातील प्रयोगांमधून डेटा गोळा केला जात आहे. एआय सेन्सर ऊस लागवडीतील पाण्याचे योग्य प्रमाण, कोणत्या क्षेत्रात कोणत्या खताची कमतरता आहे याचा अंदाज घेत आहेत. हवामान, वाऱ्याचा वेग आणि रोग आणि कीटकांचा अंदाज लावत आहेत.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायदे

या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च कमी होण्यास आणि मातीची सुपीकता आणि उत्पादन वाढविण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील एका प्रगतीशील शेतकऱ्याच्या एका एकर जमिनीवर या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली. हे तंत्रज्ञान हवामान केंद्रे, उपग्रह समर्थन आणि सेन्सरमधील डेटा वापरून सल्ला देते. डॉ. योगेश पतके यांच्या मते, या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना 50 टक्के नफा मिळत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसह शेतीमध्ये नवीन अध्याय सुरू झाला आहे. या प्रयोगाद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ उत्पादन वाढविण्यास मदत करत नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील बनवू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आता शेती अधिक वैज्ञानिक आणि फायदेशीर पद्धतीने करता येते.

ऊसासाठी एआय ठरणार गेमचेंजर!

साखर कारखान्यांना पुरेसा ऊस मिळत नाही, त्यामुळे गाळप हंगाम फक्त 100 दिवस किंवा त्याहूनही कमी काळ टिकतो. यामुळे कारखान्यातील यंत्रसामग्रीचा वापर कमी होतो आणि आर्थिक व्यवहार्यतेवर नकारात्मक परिणाम होतो. प्रति एकर उसाचे उत्पादन वाढवणे हाच उपाय आहे. हे साध्य करण्यात एआय मोठी भूमिका बजावू शकते. एआयचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवल्याने अधिक साखर आणि इथेनॉल सारखी उत्पादने मिळतील.

एआय ऊसाच्या अर्थव्यवस्थेत मोठी क्रांती आणू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास आणि चांगले उत्पन्न मिळविण्यास मदत होऊ शकते. म्हणून आपण हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर राबवले पाहिजे. एआय सर्व पिकांसाठी उपयुक्त ठरेल, परंतु ते उसासाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरेल. कृषी विकास ट्रस्टने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने एक कार्यक्रम सुरू केला आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या शेतात एआय तंत्रज्ञान बसवण्याचा सुरुवातीचा खर्च प्रति हेक्टर 25 हजार रुपये आहे. यापैकी शेतकऱ्याला 9 हजार रुपये खर्च करावे लागतील. 6,750 रुपये साखर कारखाना आणि 9,250 रुपये वसंतदादा इन्स्टिट्यूट देणार आहे. म्हणजेच, शेतकऱ्याला खर्चाच्या 64 टक्के रक्कम मदत म्हणून मिळेल. राज्य कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आता या प्रकल्पात अधिक रस घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. एआय लागू करण्यासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे.

64 टक्के रक्कम अनुदान मिळणार

एआय तंत्रज्ञानामुळे ऊसाच्या अर्थव्यवस्थेत बदल होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारण्यास आणि चांगले उत्पन्न मिळविण्यास मदत होऊ शकते. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान बसवण्याच्या खर्चाच्या 64 टक्के रक्कम अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे. महाराष्ट्रात ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवला जाईल. यासाठी पुणे साखर कारखाना आणि वसंतदादा साखर संस्था शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान बसवण्याच्या खर्चाच्या 64 टक्के रक्कम देणार आहेत. यासंदर्भात त्यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. उसाव्यतिरिक्त, भात आणि बागायतीमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल, असं सांगण्यात येतंय.

Disclaimer : शेतीसाठी एआय फायदेशीर ठरमार आहे. वॉर रूम आणि एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. एआयमुळे शेतकरी नक्की कसे मालामाल होणार, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Leave a Comment