काय सांगता? अहिल्यानगर जिल्ह्यात 17 तालुके होणार? CM फडणवीसांनी नेमके कोणते संकेत दिले

काय सांगता? अहिल्यानगर जिल्ह्यात 17 तालुके होणार? CM फडणवीसांनी नेमके कोणते संकेत दिले

Ahilyanagar District Division Or Taluka Division Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 मे 2025 रोजी हिंगोलीमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील काही नव्या तालुकांच्या निर्मितीचे संकेत दिले, विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव अन् आखाडा बाळापूर यांच्या तालुका करण्याचा प्रस्ताव त्यांनी हिंगोलीकरांसमोर जाहीर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात तालुका विभाजनाच्या चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर आता अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा 14 वरुन 17 तालुके होणार का? अशी चर्चा उपस्थित होत आहे.

फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं?

गोरेगावला अप्पर तालुक्याच्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील; लवकरच गोरेगाव तालुका घोषित केला जाईल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. आखाडा बाळापूर तालुका या प्रस्तावाबाबत माहिती घेतली जाईल. भविष्यात निर्णय घेतला जाईल, असंही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर नगर जिल्ह्यातील विभाजन पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा

अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर येथे नवीन जिल्हास्थान केंद्र निर्माणाचे पूर्वीपासूनचे प्रस्ताव आहेत. 2020 मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने 22 नव्या जिल्ह्यांच्या आणि 49 नव्या तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. शहराचे प्रशासनिक कामकाज अधिक कार्यक्षम व्हावे म्हणून महसूल कार्यालयांच्या फेररचनेबरोबर नव्या तालुक्यांची निर्मिती विचाराधीन आहे. परंतु फेब्रुवारी 2025 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘सध्यातरी कोणताही नवा जिल्हा किंवा तालुका होणार नाही’ असं स्पष्ट केलं होतं.

एका समितीने 2020 साली मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील ठेवला होता. राज्यामध्ये 22 नवे जिल्हे आणि 49 नवे तालुक्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू देखील केल्या होत्या. परंतु कामाची व्याप्ती जास्त असल्या कारणाने समितीचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

येत्या संभाव्य नव्या तालुक्यांची यादी

नगर जिल्हा विभाजन झाल्यास, या 14 विद्यमान तालुक्यांमध्ये किमान 17नव्या तालुक्यांची निर्मिती होऊ शकते. पुढीलप्रमाणे तालुक्यांचं विभाजन होवू शकतं.

  • श्रीरामपूर: बेलापूर आणि टाकळीभान
  • राहुरी: पुणतांबा आणि कोल्हार
  • राहुरी: देवळाली आणि वांबोरी
  • अकोले: राजूर आणि कोतूळ
  • संगमनेर: तळेगाव आणि साकूर
  • नेवासा: घोडेगाव आणि कुकाणा
  • कोपरगाव: संवत्सर आणि पोहेगाव

हे नवे तालुके नाही, तर कमीत कमी महसूल उपविभाग (Revenue Sub-Division) किमान आश्वी (संगमनेर), घोडेगाव (नेवासा), राजूर (अकोले) येथे तयार होणारी चर्चाही जोर धरली आहे

राजकीय पार्श्वभूमी

भौगोलिक विकास, लोकसंख्या वाढ, नागरिकांची सुविधाआणि विकास लक्षात घेऊन तालुका अन् जिल्हा पुनर्रचना आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील राजकीय तणाव देखील कारणीभूत आहेत. निवडणुकीच्या काळात आघाडीतील संघर्षामुळे प्रस्ताव मागे गेले, परंतु पुन्हा चर्चेत आले आहेत. आर्थिक तडजोडीसाठी देखील तालुक्यांच्या विभाजनाचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचं म्हटलं जातंय. महसूल कार्यालयांचा विस्तार खर्चिक असल्याने सरकारने सुरुवातीला प्रस्ताव मागे घेतला. पण आता चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी “सध्यातरी कुठलेही नवीन जिल्हा अथवा तालुका होणार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगून चर्चेला पूर्णविराम दिला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगोली येथील कार्यक्रमात तालुक्यावर दिलेला जोर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संभाव्यता याने तालुक्यांच्या निर्मितीची चर्चा पुन्हा वेगाने पेटली आहे. भविष्यातील निर्णय काय असेल, हा प्रश्न सध्याच्या राजकीय, आर्थिक प्रक्रियांवर अवलंबून राहील. अहिल्यानगर जिल्हा सात उपविभागांत विभागलेला आहे. एकूण14 तालुके आहेत. हे सर्व तालुके वेगवेगळ्या भूगोल, संस्कृती, अन्नधान्ये आर्थिक क्षेत्र, पाणीसाठा आणि सुविधेच्या आधारावर महत्त्वाची आहेत. भविष्यातील प्रशासकीय विभागणीचा प्रस्ताव त्यात पुन्हा नव्याने चर्चा नोंदवत आहे.

तालुका विभाजन का गरजेचे?

  • राज्यात होत असलेले नागरिकरण
  • ⁠वाढलेली लोकसंख्या आणि विकासकामे
  • जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांचे वाढलेले कामकाज
  • अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने गैरप्रकार
  • नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागावे

Disclaimer: मागील काही दिवसांपासून जिल्हा, तालुके विभाजनाच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हिंगोलीमध्ये बोलताना तेथे तालुका विभाजनाचा हेतू बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यात 17 तालुके होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Leave a Comment