Ahmedabad Air India Plane Crash 3 stories of family: अहमदाबाद विमान अपघाताने दुःख आणि अश्रूंनी भरलेल्या अनेक कहाण्या मागे सोडल्या आहेत. या कथांमध्ये प्रियजनांना गमावण्याचे दुःख तर आहेत. अनेक कहाण्या समोर येत आहेत. शेकडो कुटुंबांना दु:खाच्या अंधारात ढकलले गेले आहे. गुरुवारी, 12 जून रोजी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर कोसळले. लंडनला जाणाऱ्या या विमानाच्या अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली. या अपघातानंतर अशा खऱ्या कथा समोर येत आहेत, ज्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या आहेत. या कथा तुटलेल्या आशा, कुटुंबे अपूर्ण राहणे, प्रियजनांचे निधन याची उदाहरणे आहेत. आज आपण तीन पाच कुटुंबाच्या कहाण्या जाणून घेऊ या.
मला पैसे नकोत, मला बाबा हवेत
‘तुम्ही मला एक कोटी देत आहात, मी तुम्हाला दोन कोटी देईन, फक्त माझे वडील परत द्या…’ हे शब्द आहेत अहमदाबाद विमान अपघातात वडिलांना गमावलेल्या मुली फाल्गुनीचे. फाल्गुनीच्या या वक्तव्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलंय. तिच्या आवाजात राग आणि असहाय्यता जाणवते. माझ्या वडिलांचा काय दोष होता? ते या विमानात चढले? असे सवाल फाल्गुनी करत आहे. मी एक मुलगी आहे, कृपया माझ्या वडिलांना माझ्याकडे परत आणा. एअर इंडिया मजाक करत आहे. त्यांच्याकडून कोणतेच उत्तर नाही, सहानुभूती नाही, असं देखील फाल्गुनीने म्हटलं आहे.
रडत रडत फाल्गुनी म्हणाली, तुम्ही एक कोटी देण्याचं सांगता. पण मी दोन कोटी देईन त्या बदल्यात माझ्या वडिलांना परत आणा. लोकांना पैशाने खरेदी करता येईल का? त्या पैशाने आपण बेड खरेदी करू, पण मी त्यावर कशी झोपणार, माझे वडील मला जे खरे प्रेम देत होते, ते मला कुठून मिळेल. माझे वडील देशभक्त होते. ते स्वतःला एअर इंडियाचे अभिमानी प्रवासी मानत असत. ते अनेकदा म्हणायचे, एअर इंडिया हा आपला अभिमान आहे, तो देशाचा अभिमान आहे. माझ्या वडिलांना देशभक्तीचे काही बक्षीस मिळाले का? देशाचे नाव अशा प्रकारे चालवावे लागते का? जर तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल तर एअर इंडिया बंद करा.
10 मिनीटे उशीर झाल्यामुळं वाचला भूमीचा जीव
भूमी नावाच्या एका महिलेची ही फ्लाईट चुकली. त्यामुळे तिचा जीव वाचला. भूमी म्हणाली, माझ्या फ्लाईटची वेळ दुपारी 1:10 मिनिटांती होती आणि मला 12:10 च्या आधी विमानतळावर पोहोचायचे होते. रस्त्यात खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे मी विमानतळावर 12 वाजून 20 मिनिटांनी पोहोचले. त्यामुळे मी मी चेक-इन करू शकले नाही आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला परत जाण्यास सांगितले. त्यामुळे माझी फ्लाईट चुकली. सुरुवातीला मी विचार करत होते की जर मी थोडी लवकर आले असते, तर काही नुकसान झाले नसते आणि मी फ्लाईट पकडू शकलो असतो. पण आता मला वाटते की, जे काही झालंय ते चांगल्यासाठीच होतं.
भूमीने अपघाताबद्दल सांगितले की, ‘मी विमानतळावरून घरी परतत होते आणि वाटेत मला कळले की मी ज्या विमानात चढणार होते ते विमान क्रॅश झाले आहे. माझे शरीर खरोखरच थरथर कापत होते. मी बोलू शकत नव्हतो. जे घडले ते ऐकून मी स्तब्ध झालो. जे घडले ते खूप भयानक आहे. इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते असंही भूमीने म्हटलंय.
डॉक्टर कुटुंबाचा शेवटचा सेल्फी
एक डॉक्टर जोडपे त्यांच्या तीन मुलांसह ब्रिटनला जाऊन एक नवीन सुरुवात करणार होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. लंडनला जाणारा विमान प्रवास हा त्या 5 जणांच्या सुंदर कुटुंबासाठी शेवटचा प्रवास ठरला. लंडनला जाणारा विमान अपघात होण्यापूर्वी त्यांनी एक गोंडस सेल्फी काढला. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणारा त्यांचा शेवटचा सेल्फी हृदयाला हादरवून टाकणारा आहे. राजस्थानमधील बांसवाडा येथील एका खाजगी रुग्णालयात पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉ. कोनी यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा देऊन लंडनमधील डॉक्टर पती प्रतीक जोशी आणि त्यांच्या तीन मुलांसह नवीन जीवन सुरू करणार होत्या. त्यांनी विमान उड्डाण करण्यापूर्वी कुटुंबाने एक सेल्फी काढला होता.पण हा सेल्फी काढल्यानंतर काही मिनिटांतच सर्व काही बदलले. पाचही जणांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.
Disclaimer : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 गुरुवारी, 12 जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळले. या अपघातात एकूण 265 जणांना आपला जीव गमवला आहे.