history of maratha reservation : मनोज जरांगेंनी हजारो मराठा आंदोलकांसोबत मुंबई गाठली, आणि उपोषणाला सुरवात केली. तर मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधवांनी मुंबईतच ठिय्या मांडला आहे. एकूणच यावरून या वेळेसच्या मराठा आंदोलनाची तीव्रता दिसून येत आहे. तर या आंदोलनाला यश मिळेल आणि कितीतरी वर्षांपासून केली जाणारी मराठा आंदोलनाची मागणी पूर्ण होईल अशी आशा सुद्धा व्यक्त केली जातीये. हो अनेक वर्षांपासूनची केली जाणारी मागणी. गेल्या दोन एक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त होऊन प्रसिद्धी मिळाली आहे पण मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास त्याहूनही खूप जुना आहे. म्हणूनच नक्की काय आहे मराठा आरक्षणाचा इतिहास? कशी सुरवात झाली होती आरक्षणाच्या लढ्याला? ते जाणून घेऊया…
मराठा आरक्षणाचा संघर्ष कसा सुरु झाला
मराठा आरक्षणाच्या मागणीने गेल्या दशकभरापासून जोर धरलेला आहे पण मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला. पण त्यांना त्यात यश मिळाले नाही म्हणून 1982 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली पण त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली मागणी आणि तो संघर्ष असूनही जिवंत आहे . त्यानंतर obc आरक्षण लागू झाल्यावर , मराठा कुणबी , कुणबी मराठे यांना आरक्षण मिळालं पण कुणबी अशी नोंद नसलेल्या मराठ्यांना आरक्षण नाकारलं गेलं .
मराठ्यांना obc प्रवर्गामध्ये समावेशित करण्यास नकार
२००८ साली बापट आयोगानं मराठ्यांना obc प्रवर्गामध्ये समावेशित करण्यास नकार दिला आणि मराठ्यांची राज्यभर शांतता पूर्ण रीतीने आंदोलने चालू झाली , म्हणून २०१३ साली नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली , या समितीने मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अहवाल दिला . व मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली त्याप्रमाणे २०१४ जून मध्ये पुर्थ्वीराज चव्हाण सरकारने या शिफारसी मान्य केल्या पण २०१४ नोव्हेंबर मध्ये मुंबई हायकोर्टाने आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली . त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने sebc या प्रवर्गातून मराठा आरक्षण दिल , परंतु सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण अवैध ठरवलं आणि मराठा आरक्षणाची मागणी मागणी च राहिली .
मराठा आरक्षणाची मागणी जिवंत ठेवली गेली
अनेकदा हाती अपयश येऊनही मराठा आरक्षणाची मागणी निकराने चालू ठेवली गेली, कधी भव्य शांती मोर्चे काढून कधी उपोषण करून मराठा आरक्षणाची मागणी जिवंत ठेवली गेली होती पण तिची तीव्रता हळू हळू कमी होऊ लागली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा चालू असणारा लढा प्रसिद्धी पासून लांब राहिला. पण एका आंदोलनाने सगळी परिस्थिती बदलली आणि प्रसिद्धी पासून लांब राहिलेला मराठ्यांचा लढा अचानक बातम्यांच्या हेडलाइन्स मध्ये झळकू लागला. सप्टेंबर २०२३ मध्ये खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला जीवनदान मिळालं. याच महिन्यात मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचं नेतृत्व करणारा नेता सुद्धा मराठा समाजाला मिळाला होता. तो म्हणजे मनोज जरांगे.
आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्जे केला
२०२३ मध्ये झालेल्या मराठा आरक्षणा साठीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी चार्जे केला होता. ज्याची माध्यमांनी दखल घेतली आणि विविध स्तरातून याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. या आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या लढ्याला अजून व्यापक स्वरूप देत, मेन stream मधून बाहेर पडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा चर्चेच्या मुख्य प्रवाहात आणलं. त्यासोबतच आंदोलनानंतर मनोज जरंगे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला माहित पडलं. तस तर या आंदोलनाच्या आधीपासून कितीतरी वर्ष मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत होते, पण त्यांचं नाव प्रसिद्धी झोतापासून लांब होत. पण या आंदोलनानंतर मनोज जरांगे हे नाव लाइमलाइट मध्ये यायला सुरवात झाली.
नेत्याना गावात प्रवेशबंदी
सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या या आंदोलनानंतर सुद्धा मनोज जरांगेंनी अनेकदा उपोषण केली. सरकारनी यावेळी वेगवेगळी आश्वासन दिली, जरंगेंनी सुद्धा सरकारला अनेक मुदती दिल्या पण मुदत देऊनही सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोष वाढला मागणी अजूनच तीव्र झालेली पाहायला मिळाली, तसेच याच काळात मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार सुद्धा समोर आला त्यामुळे आंदोलनांची तीव्रता वाढत असल्याचं पाहायला मिळालं. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीची हिची तीव्रता अजून वाढवण्यासाठी गावागावांमध्ये साखळी उपोषणाला सुरवात करा, शांतता पूर्ण पद्धतीने आंदोलने करा, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश करू देऊ नका, आमरण उपोषण करा असं आवाहन मनोज जरंगेंनी केल सोबत यादरम्यान कोणाला काही झालं तर सर्व जबाबदारी सरकारची असेल असं सुद्धा सांगितलंय. आणि जरांगेच्या याच आवाहनाचा परिणाम म्हणून अजित पवार यांना त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता तर केंद्रीय मंत्री भागवतांना त्यांच्या कार्यक्रमाचं स्थान बदलावं लागलं होत.
२०२४ च संपूर्ण वर्ष सरल
उपोषण होणार, मग सरकार उपोषण मिटवण्यासाठी आश्वासन देणार, जरांगे हि आश्वासन पूर्ण करण्यासाठी मुदत देणार, पण ठरलेल्या मुदतीत आश्वासनं पूर्ण होणार नाहीत, मग पुन्हा आंदोलन आणि तेच सगळं या सगळ्यात २०२४ च संपूर्ण वर्ष सरल. पण आरक्षण काही मिळालं नाही. त्यामुळे आता आरक्षण घेऊनच शांत बसणार असा नारा देत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली आहे. तर या आंदोलनाची व्यापकता पाहता मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या ४०-५० वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा चालू आहे ज्यासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली तर अनेकांनी घर दार सोडून मराठा आरक्षणासाठी जीवन समर्पित केलं तर मराठ्यांच्या या कैक वर्षांपासूनच्या लढ्याला आतातरी यश मिळणार का ? मराठ्यांना आरक्षण मिळणार का ? हे येणारी वेळच सांगेल पण यावर तुमचे मत काय? आम्हाला कमेंट मध्ये सांगा.