नोकराच्या डोक्यात सैतान घुसला! मालकाच्या बायकोला अन् मुलाला संपवलं, थरारक हत्याकांड…

Disclaimer : विश्वासघाताची थरारक कहाणी समोर आली आहे. दिल्लीतील लाजपत नगरमध्ये नोकरानेच मालकाच्या बायकोची आणि मुलाची निर्दयी हत्या केली. आपण या घटनेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.

Delhi Double Murder Servant Killed Woman And Her Son : एक विश्वास..एक घर… आणि एक क्रूर हत्याकांड! दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये घडलेली ही घटना तुमच्या अंगावर काटा आणेल. घर… जिथं आपण सर्वात सुरक्षित असतो. पण जर तिथेच विश्वासाचाच खून झाला, तर? २ जुलै, बुधवारी संध्याकाळ…रुचिका सेवानी आणि तिचा १४ वर्षांचा मुलगा क्रिश. स्वतःच्या घरात मृत अवस्थेत आढळतात. रात्री ९.३० वाजता पती कुलदीप घरी पोहोचले. दरवाजा बंद…फोन न उचलणं…गेटजवळ आणि जिन्यावर रक्ताचे डाग! पोलिसांनी दरवाजा तोडला आणि समोर आलं एक थरारक दृश्य…रुचिका – रक्ताच्या थारोळ्यात आणि बाथरूममध्ये तिचा मुलगा क्रिश – मृत अवस्थेत. दिल्लीतील लाजपत नगर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक वर्षांपासून एका घरात विश्वासाने काम करणाऱ्या व्यक्तीने अचानक संतापाच्या भरात मालकिन आणि तिच्या अल्पवयीन मुलाची क्रूर हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. ही दुहेरी खूनप्रकरणाची घटना २ जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली. लाजपत नगर मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान चालवणारे कुलदीप सेवानी आणि त्यांची पत्नी रुचिका सेवानी या घरात राहत होते. रुचिका (वय ४२) आणि त्यांचा मुलगा क्रिश (वय १४) यांची निर्घृण हत्या त्यांच्या घरगुती मदतनीसाने केली. आरोपीचे नाव मुकेश असून तो या कुटुंबात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो घरातील कामांमध्ये देखील मदत करायचा.

एक भयानक संध्याकाळ

बुधवारी रात्री सुमारे ९.३० वाजता कुलदीप कामावरून घरी परतले, तेव्हा दरवाजा बंद होता. पत्नी आणि मुलाला अनेक वेळा कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांना शंका आली. दरम्यान, घराजवळ आणि जिन्यावर रक्ताचे डाग दिसल्याने ते अधिकच घाबरले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच दरवाजा तोडला आणि समोर आलेले दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. रुचिका यांचा मृतदेह पलंगाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या डोक्याभोवती रक्त साचले होते. तर दुसऱ्या खोलीत बाथरूममध्ये, त्यांचा मुलगा क्रिश देखील रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृत आढळला.

हत्या का केली?

या दुहेरी हत्येनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी मुकेशला लवकरच अटक केली. तो शहरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार, रुचिका यांनी त्याला फटकारल्यामुळे तो रागावला होता आणि संतापाच्या भरात त्याने चाकूने हल्ला करून हत्या केली. मुकेश अनेक वर्षांपासून सेवानी कुटुंबासोबत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला घरात आणि दुकानात काम देण्यात आले होते. मात्र, त्याने या विश्वासाला तडा देत दोन निरपराध जीवांचा जीव घेतला. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. पोलीस सध्या अधिक तपास करत असून हत्येचे अचूक कारण, आरोपीचे मानसिक स्थिती आणि इतर कोणतेही पुरावे तपासले जात आहेत.

मुकेश तीन-चार वर्षांपासून कुटुंबासोबत

पोलिस उपायुक्त हेमंत तिवारी म्हणाले की, बिहारचा रहिवासी असलेला आरोपी नोकर मुकेश (२४) याला यूपी पोलिसांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवर ट्रेनने बिहारला पळून जात असताना अटक केली. पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, बुधवारी रात्री ९:४३ वाजता लाजपत नगरचे रहिवासी कुलदीप सेवानी (४४) यांचा पोलिस नियंत्रण कक्षाला (पीसीआर) फोन आला तेव्हा ही बाब उघडकीस आली की त्यांची पत्नी रुचिका (४२) आणि १४ वर्षांचा मुलगा फोन उचलत नाहीत. त्यांच्या घराच्या पायऱ्यांवर रक्ताचे डाग आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, पीसीआर व्हॅन आणि लाजपत नगर पोलिस पोहोचले तेव्हा घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. घराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रक्ताचे डाग आढळले.

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातून रुचिका आणि तिच्या मुलाचे मृतदेह आढळले. रुचिका यांचा मृतदेह बेडरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला आणि मुलाचा मृतदेह बाथरूममधून सापडला. त्यांनी सांगितले की दोघांचीही धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. घरात सर्वत्र रक्ताचे डाग होते. महिलेची मान ८० टक्के कापलेली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुकेश तीन-चार वर्षांपासून कुटुंबासोबत काम करत होता. तो घरकाम करत असला तरी, तो लाजपत नगर मार्केटमधील कुलदीप आणि रुचिका यांना त्यांच्या कपड्यांच्या दुकानात मदत करत असे आणि त्यांचा ड्रायव्हर म्हणूनही काम करत असे.

Leave a Comment