Dhanteras Wishes 2025 : दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि समृद्धीचा उत्सव. या पाच दिवसांच्या मंगल पर्वाची सुरुवात होते
Diwali 2025 Dhantrayodashichya Shubhecha : दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि समृद्धीचा उत्सव. या पाच दिवसांच्या मंगल पर्वाची सुरुवात होते, धनत्रयोदशी किंवा धनतेरस या दिवसाने. 2025 मध्ये धनत्रयोदशीचा सण शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी पासून दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवशी संपूर्ण भारतातच नव्हे, तर जगभरातील भारतीयांच्या घरांमध्ये दिव्यांचा लखलखाट, फुलांचा सुगंध आणि उत्साहाची झळाळी अनुभवायला मिळते.
धनत्रयोदशीचा अर्थ आणि महत्त्व
‘धन’ म्हणजे संपत्ती आणि ‘त्रयोदशी’ म्हणजे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. या दिवसाचे महत्त्व केवळ धनप्राप्तीपुरते मर्यादित नाही. आरोग्य, आयुष्य आणि समाधान ही देखील खरी संपत्ती आहे. त्यामुळेच धनत्रयोदशीला आरोग्यदेवता भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. (Dhanteras Wishes 2025) धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. समुद्रमंथनाच्या वेळी ते अमृतकलश आणि आयुर्वेदाचे ज्ञान घेऊन प्रकट झाले, असे पुराणात वर्णन आहे. त्यामुळे या दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून लोक निरोगी आयुष्य, रोगमुक्त शरीर आणि मन:शांतीची कामना करतात.
लक्ष्मी, कुबेर आणि गणपतीपूजनाचं विशेष महत्त्व
धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि भगवान गणपती यांचंही पूजन केलं जातं. लक्ष्मी म्हणजे धनाची देवी, कुबेर हे देवांचे खजिनदार तर गणपती सर्व शुभकार्याचे प्रारंभकर्ते. (Dhanteras Wishes 2025)
म्हणूनच हा दिवस घराघरात उत्साहाने साजरा केला जातो. देवतांच्या आशीर्वादाने वर्षभर समृद्धी, सुख आणि स्थैर्य लाभावं, हीच सर्वांची मनोकामना असते. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. नवीन खरेदी, सुवर्णदागिने किंवा भांडी विकत घेण्याची परंपरा या दिवशी पाळली जाते. कारण अशी मान्यता आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली खरेदी संपूर्ण वर्षभर शुभ फलदायी ठरते.
धनत्रयोदशी आपल्याला शिकवते की खऱ्या अर्थाने ‘धन’ म्हणजे फक्त पैशांचा साठा नाही. ते म्हणजे आनंद, आरोग्य, दयाळूपणा, आणि समाधान. आपल्या कुटुंबात जर प्रेम असेल, मनात जर कृतज्ञता असेल आणि शरीर निरोगी असेल, तर तेच सर्वात मोठं धन आहे. म्हणून या दिवशी केवळ सोनं किंवा चांदी विकत घेऊ नका, तर आयुष्यातील नाती, आठवणी आणि स्वतःचं आरोग्य जपा.
धनत्रयोदशीसाठी खास शुभेच्छा संदेश (Dhanteras Wishes 2025)
- रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिव्यांच्या उजेडात मन उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! - लक्ष्मी आली तुमच्या दारी,
आनंद, शांती आणि समाधान घेऊन घरी.
धन्वंतरीच्या कृपेने राहो आरोग्यसंपन्न जीवन,
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा मनःपूर्वक! - धनत्रयोदशीच्या पवित्र क्षणी,
देवता धन्वंतरी आणि माता लक्ष्मी प्रसन्न होवोत.
प्रत्येक क्षण मंगलमय, प्रत्येक दिवस सुवर्णमय होवो! - धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्संवत्सरं दीर्घमायुरस्तु,
अमृतमयी मंगलमय हो,
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! - नात्यांची गोडी, हास्याची गाणी,
फराळाची मेजवानी, मनात प्रेमाची वाणी,
असाच उजळा तुझा प्रत्येक दिवस,
शुभ दीपावली! - ही दिवाळी तुमच्या आयुष्यात
नवीन संधी, नवी स्वप्नं आणि नवं यश घेऊन येवो,
प्रत्येक दिवस फुलावा आनंदाने,
दिवाळीच्या मंगल शुभेच्छा! - लक्ष्मीमाता येवो तुमच्या घरी,
कुबेरदेवांची कृपा असो अंगणी,
धन, धान्य, आरोग्य आणि समाधान लाभो,
दिवाळीच्या शुभेच्छा! - नात्यांची गोडी, हास्याची गाणी,
फराळाची मेजवानी, मनात प्रेमाची वाणी,
असाच उजळवा तुमचा प्रत्येक दिवस,
शुभ दीपावली! - फुलबाज्यांचा आवाज, दिव्यांचा लखलखाट,
फराळाचा सुगंध, हसऱ्या चेहऱ्यांचा साथ,
असंच राहो आयुष्यभर हे आनंदाचं वातावरण,
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा! - लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो तुमचं आयुष्य,
प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो,
लक्ष्मीमातेची कृपा आणि गणपतीबाप्पाची साथ लाभो,
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनासाठी केवळ अडीच तास (diwali 2025)
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन! धन, समृद्धी आणि शुभतेसाठी या दिवशी सर्वजण देवी लक्ष्मीची आराधना करतात. यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त फक्त अडीच तासांचा आहे, त्यामुळे पूजाविधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी तयारी आधीच करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आणि पूजाविधीची माहिती.
लक्ष्मीपूजनाची तारीख आणि शुभ मुहूर्त ( diwali 2025)
20 ऑक्टोबर 2025 (सोमवार) रोजी प्रदोषकाळात अमावस्या तिथी सुरू होत आहे, ज्यामुळे ती तिथी प्रदोषकाळात येते. मात्र, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रोजी अमावस्या तीन प्रहरांपेक्षा जास्त काळ राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 हा दिवस अत्यंत शुभ आणि शास्त्रसंमत मानला जातो. अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्यामुळे, सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांचा कालावधी हा लक्ष्मीपूजनासाठी सर्वात योग्य आणि मंगलकारी ठरेल.
अधिक माहितीसाठी- http://instagram.com/lokswarajyalive?igsh=MTR1ZXBlZTl1NTB2ZA==
पूजाविधी
सुरुवात घर स्वच्छ करून, पूजा स्थळावर लाल कापड ठेवून करा. दीपक प्रज्वलित करा, गंधदुम, धूप लावा. गणेशजींचे पूजन करून धनदायिनी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्रासमोर स्थापना करा. नैवेद्य, फळे, फुलं ठेवून स्तोत्र किंवा श्लोकांचा उच्चार करा. लक्ष्मीमंत्राचा जप करा आणि हळदी-केशराची तांदळी देवीसमोर अर्पण करा. प्रसाद घरातील सर्व सदस्यांना वाटून द्या.