Disclaimer- नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळेगाव, करपाळा शिवारात थरकाप उडवणारी घटना घडली… या घटनेने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झालेल आहे. सासरच्या मंडळीने सुनेला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं. ,सासरच्या मंडळीकडून माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला. या घटनेमूळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. आता हा नेमकं काय प्रकार आहे. तिथे काय घडलं आहे. आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतलं का तेच सविस्तर जाणून घेऊ.
Father kills married daughter in Nanded : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळेगाव, करपाळा शिवारात थरकाप उडवणारी घटना घडली… याघटनेमुळे अख्या नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. तसेच परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका वडिलाने आपल्या मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने वडिलांनी प्रियकर आणि प्रियसीला एका विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला. नेमकं काय आहे हा प्रकार सविस्तर जाणून घेऊ.
नेमकं प्रकरण काय आहे ?
उमरी तालुक्यात गोळेगाव, करपाळा शिवारात एका विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकरास सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ही बाब माहेरच्यांना कळवण्यात आली. माहेरच्या मंडळीला आपल्या विवाहित मुलीला आमच्या घरी येऊन घेऊन जाण्यास सांगितले. तरुणीच्या वडिलांनी मुलीस आणि तिच्या प्रियकराला गावी घेऊन जात असल्याचे सांगून वाटेतील करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असून, प्रियकराचा अद्याप शोध लागला नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत विवाहित तरुणी संजीवनी कमळे आणि तिच्या प्रियकराचे नाव लखन बालाजी भंडारे असल्याचं समोर आलं आहे. उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील संजीवनी कमळे या तरुणीचा गतवर्षी गोळेगाव येथील युवकासोबत विवाह झाला होता. मात्र, सदरील तरुणीचे गावातीलच लखन बालाजी भंडारे या युवकासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम असल्याचे पुढे आले आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी त्यांच नाव मारोती सुरणे यांनी लखन भंडारे यास हे संबंध थांबविण्याबाबत वारंवार समजावून सांगितले होते. तरीही संजीवनीचा प्रियकर लखन हा सोमवारी तिच्या सासरी गोळेगाव येथे तिला भेटायला आला होता. ते दोघे एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले.. तरुणीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहाथ पकडले. लखन भंडारेला आणि संजीवनीला तिच्या सासरच्या मंडळीने बांधून ठेवले. हा सर्व प्रकार संजीवणीच्या माहेरी कळविण्यात आला. त्यावेळी तरुणीचे वडील मारुती सुरणे आणि इतर दोघेजण गोळेगावला पोहोचले. सासरच्या मंडळींनी घडला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला आणि आपली मुलगी घेऊन जाण्यास सांगितलं. त्यावेळी वडील मारोती सुरणे यांनी संतापात दोघांना गावी घेऊन जातो असं सांगितलं आणि तेथून ते निघाले. सोबत आलेले इतर नातेवाईकांनीही तरुणी आणि तिच्या प्रियकरास गावाकडे नेत असल्याचे सांगून गोळेगावहून निघाले. करकाळा मार्गे ते पायीच बोरजुनीला जात होते. वाटेतच झाल्या प्रकाराचा संताप आल्याने तरुणीच्या वडिलांनी व इतर नातेवाईकांनी दोघांनाही करकाळा शिवारातील एका विहिरीत त्यांना जिवंत फेकून दिले. दोघांचेही हात बांधलेले असल्याने त्यांना विहिरीबाहेर पडता आले नाही.
पोलिस तपास सुरू
ही बाब काही वेळाने उघडकीस आली. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच त्या घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरु केला. स्थानिकांनी ही या दोघांचाही शोध सुरू केला. त्यात रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला आहे. तरुणाची कुठलीही माहिती अद्याप समोर आली नसून शोध सुरू आहे.
आरोपींवर खुनाच्या गुन्हाची नोंद
पोलिसांनी आरोपी असलेल्या तरुणीचे वडिल मारोती सुरणे आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर खुनाच्या गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांनी माहिती देत या पुढील घटनेचा तपास पोलिस करत आहेत असं सांगितलं..