संत तुकाराम महाराज अन् संत ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीचा इतिहास, दोन्ही पालख्या स्वतंत्र का निघतात?

संत तुकाराम महाराज अन् संत ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीचा इतिहास, दोन्ही पालख्या स्वतंत्र का निघतात?

History of Sant Tukaram Maharaj Palkhi and Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ashadhi Wari 2025: पालखी सोहळा ही महाराष्ट्राची एक मोठी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या पालख्या आहेत. या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातून प्रवास करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून, तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते.या पालख्यांमध्ये हजारो वारकरी सहभागी होतात. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत संपूर्ण वातावरण भक्तिमय करतात. सुरूवातीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोघांच्याही पालख्या एकत्र निघत होत्या. परंतु कालांतराने मात्र दोन्ही पालख्या स्वतंत्र निघतात, यामागे नेमके कोणते कारण आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

दोन्ही पालख्या स्वतंत्र का निघतात?

देहू संस्थानचे मालक असलेल्या तुकोबा रायांच्या वारसदारांमध्ये 1832 च्या काळात भावकी सुरू झाली. अर्थात त्या भाऊ-बंधूकीचा परिणाम वारीवर होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर काही ज्येष्ठ मंडळींनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा स्वतंत्रपणे आळंदीतून नेण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे संत तुकारामांची पालखी देहूतून पंढरपुरात निघू लागली. याचा परिणाम असा झाला की, इतर संतांच्या देखील पालख्या त्यांच्या त्यांच्या गावातून निघू लागल्या. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून निघते, तर संत तुकारामांची पालखी पंढरपुरातून आकुर्डी, लोणी काळभोर मार्गे निघते अन् पंढरपूरला पोहोचते.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

नारायण महाराज हे संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव होते. संत तुकाराम महाराजांच्या देहत्यागाच्या साधारण तीन ते चार महिन्यांनी, मातोश्री जिजाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांनी वडिलांच्या श्रद्धासंस्कृतीची खंबीरपणे जोपासना केली. विश्वाभर बाबा हे वारी परंपरेचे मूळ संस्थापक म्हणून ओळखले जातात. विश्वाभर बाबांनी आपल्या घरात विठ्ठल–रखुमाई यांच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. मूळ परंपरा कायम राखली. पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुकोबांनी दिंडी स्वरूपात, चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालूच ठेवली होती.

देहूच्या संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनानंतर, कान्होबारायांनी आणि त्यांच्या पुढील काळात तुकोबा महाराजांच्या सुपुत्र नारायण महाराजांनी पंढरीची दिंडी अखंडपणे सुरू ठेवली. मात्र, झालेल्या वयामुळे कान्होबारायांनी देवप्रवृत्तीची साहाय्य धुरा आपल्या धाकट्या सुपुत्र नारायण महाराजांकडे हस्तांतरित केली. नारायण महाराजांनी इ.स. 1685 साली पालखी सोहळा निश्चित केला. त्यांनी त्यांच्या वडिल संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन देहूतून आळंदीला यात्रा प्रारंभ केली. येथून त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाही एकाच पालखीत सामावून घेतल्या. भक्तिपूर्ण वातावरणात ही दिंडी पंढरपूरकडे प्रवासाला निघाली.

नेहमीच्या वारीप्रमाणे नारायण महाराज अगोदर काही वारकऱ्यांसह पंढरीच्या यात्रेसाठी निघाले होते. पण त्यांना आतून असे वाटू लागले की, या वारीमध्ये भक्तिरस आणि आध्यात्मिक कलशाची गरज आहे. त्यांनी ठरवले की पालखीमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या दोघांच्या पादुकांची पालखी एकत्र ठेवावी. त्यानंतर दोन्ही संतांच्या पालख्या एकत्र निघू लागल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास 700 वर्षांपूर्वीचा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोहोचते जातो. 13 व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. त्यानंतर पालखी सोहळ्याची सुरूवात झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात हैबतबाबा आरफळकर यांनी केल्याची माहिती मिळते. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 1832 साली पालखीमध्ये ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पायी जात असत. त्यानंतर, संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सुद्धा वारीची परंपरा पुढे सुरू ठेवली.

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनामध्ये प्रचंड महत्त्व आहे. ही पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. या पालखीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादूका असतात. ही वारी भक्तांसाठी अतिशय महत्वाची असते. मोठ्या श्रद्धेने वारकरी या वारीत पायी चालत पंढरपूरला पोहोचतात अन् विठुराया चरणी लीन होतात. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सांप्रदाय आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही मनोभावे जोपासली जात आहे.

Leave a Comment