Disclaimer : हल्ली आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे. जर आपण सिगारेट ओढत नसाल तरी फुफ्फुसांच्या कर्करोग वाढतोय, असा एक अहवाल समोर आलाय. या कर्करोगाची धक्कादायक कारणे कोणती आहेत, ती आपण जाणून घेऊ या.
What Is Lung Cancer Reasons : फुफ्फुसांचा कर्करोग हा अनेकदा धूम्रपानाशी संबंधित असतो. जेव्हा फुफ्फुसांच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात, तेव्हा त्या ट्यूमर तयार करतात. यामुळे फुफ्फुसांच्या योग्यरित्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हे ट्यूमर शरीराच्या इतर भागात देखील पसरू शकतात. जगभरात या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे एक प्रमुख कारण फुफ्फुसांचा कर्करोग आहे. अलिकडच्या काळात मोठ्या संख्येने धूम्रपान न करणाऱ्यांनाही या आजाराचे निदान झालंय. ते खूपच धक्कादायक आहे.
पारंपारिकपणे धूम्रपान करणाऱ्यांचा आजार मानला जाणारा फुफ्फुसाचा कर्करोग आता मोठे बदल घडवून आणत आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 20 टक्के प्रकरणे आता अशा लोकांमध्ये आढळत आहेत, ज्यांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही. आशियातील काही भागांत हा आकडा जवळजवळ 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, इतक्या लोकांनी कधीही धूम्रपान केलेले नाही, विशेषतः महिलांमध्ये परिस्थिती अधिक भयावह आहे. धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये या आजाराच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे केवळ शास्त्रज्ञांनाच आश्चर्य वाटले नाही, तर फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित संशोधनाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनही बदलला आहे.
कर्करोग वाढण्याची कारणे कोणती?
1. वायू प्रदूषण- फुफ्फुसांच्या कर्करोगाचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे वायू प्रदूषण.
2.रेडॉन वायूच्या संपर्कात येणे – रेडॉन हा एक गंधहीन, रंगहीन किरणोत्सर्गी वायू आहे.
3. मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) आणि एपस्टाईन-बार विषाणू यांसारखे काही प्रकारचे विषाणू देखील या कर्करोगाचा धोका वाढवतात.
4. स्वयंपाक करताना होणारे प्रदूषण, जसे की लाकूड किंवा शेणाच्या गोळ्यांमुळे होणारे प्रदूषण, फुफ्फुसांसाठी देखील धोकादायक असते.
फुफ्फुसांचा कर्करोग आकडेवारी आणि वास्तव
दरवर्षी 23 लाखांहून अधिक नवीन फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण नोंदवले जातात.
फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा सर्वाधिक कारणीभूत प्रकार आहे.
2023 मध्ये सुमारे 18 लाख लोकांचा मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे झाला.
पुरुषांमध्ये हा कर्करोग क्रमांक 1 वर, तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर.
धूम्रपान (स्मोकिंग) हे 85% पेक्षा अधिक केसेसमध्ये मुख्य कारण आहे.
भारतामधील आकडेवारी (ICMR, NICPR, 2023 नुसार)
भारतामध्ये दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सुमारे 90,000 नवीन रुग्ण आढळतात.
पुरुषांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे (माउथ कॅन्सरनंतर).
धूम्रपान करणाऱ्या पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका सामान्य माणसापेक्षा १५ ते ३० पट जास्त असतो.
महिलांमध्ये धूररहित इंधन, घरगुती चुलींचा धूर (Biomass Smoke) आणि Passive Smoking हे महत्त्वाचे धोके.
शहरी भागांमध्ये वायूप्रदूषण आणि औद्योगिक धुरामुळे रुग्णसंख्या वाढते आहे.
लक्षणे कोणती?
फुफ्फुसाचा कर्करोग सुरुवातीला शांत असतो, पण काही ठळक लक्षणं ही वेळेवर ओळखली तर जीव वाचू शकतो. ही लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत.
– सततचा खोकला, विशेषतः रक्तासह
– छातीत वेदना, धाप लागणे
– अचानक वजन कमी होणे
– आवाजात बदल, दम लागणे
– सतत ताप, फुफ्फुसांचे संसर्ग
कर्करोगाचं निदान कसं केलं जातं?
जर वरील लक्षणं जाणवत असतील, तर डॉक्टर खालील तपासण्या सुचवू शकतात:
– X-ray किंवा CT Scan – फुफ्फुसातील गाठ ओळखण्यासाठी
– Bronchoscopy – एक बारीक कॅमेरा टाकून फुफ्फुसांचे निरीक्षण
– Biopsy – पेशींचा नमुना घेऊन तपासणी
– PET Scan / MRI – कर्करोग शरीरात पसरला आहे का, हे पाहण्यासाठी ही टेस्ट केली जाते.
फुफ्फुसाचा कर्करोग बरा होतो का?
कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे, रुग्णाचं वय, एकूण आरोग्य या सगळ्यांवर उपचार अवलंबून असतात.
– शस्त्रक्रिया (Surgery) – गाठ काढली जाते (प्रारंभिक स्टेजमध्ये)
-केमोथेरपी – औषधं देऊन कर्करोग पेशी नष्ट केल्या जातात
– रेडिएशन थेरपी – किरणोत्सर्गाने गाठ मारली जाते
– Targeted Therapy – फक्त कर्करोगी पेशींवर परिणाम करणारी औषधं
– Immunotherapy – रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराला लढण्यास मदत
फुफ्फुसांचा कर्करोग टाळता येतो?
– धुम्रपान पूर्णपणे बंद करा
– प्रदूषणापासून बचाव करा – मास्क वापरा
– स्वस्थ आहार घ्या – फळं, भाज्या, अँटीऑक्सिडंट्स
– प्राणायाम, योगासने करा – फुफ्फुसं मजबूत राहतात
– दरवर्षी तपासणी करून घ्या, विशेषतः जर धुम्रपान करत असाल तर