बिगुल वाजलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू

बिगुल वाजलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू

Maharashtra Local Body Elections Preparation Begins : सुरुवातीला कोरोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा. या सगळ्या कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या. परंतु अखेर आता राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीची तयारी देखील सुरू झाली आहे. तर 11 जून ते 1 सप्टेंबर दरम्यान नऊ टप्प्यात हे नियोजन करण्याची सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे संकेत नुकतेच दिले आहेत. यानुसार आता संबंधित संस्थांना निवडणुकीपूर्वी आवश्यक नियोजनाची तयारी करण्याचे सूचना पत्र देण्यात आलेय.

नऊ टप्प्यात होणार्‍या निवडणूक नियोजन कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश आहे? तर पाचव्या टप्प्यामधील पारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती, सूचन मागवणे. पुढील टप्प्यात सुनावणी, त्यानंतर हरकती, सूचना आयोगाकडे पाठवणे. यातील महत्त्वाच्या टप्प्यातील प्रक्रिया या दरम्यान 5 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तर सर्वात शेवटी 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतीम केलेली प्रभाग रचना स्पष्ट होणार आहे. एकूणच निवडणूक आयोगाकडून जो कार्यक्रम आलाय. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील महानगरपालिका-नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक

राज्य शासनाने महानगरपालिका आणि नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचा वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याप्रमाणे, संपूर्ण महाराष्ट्रातील 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिका यांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी आणि इतर 23 महानगरपालिका यांच्यासाठी कालबद्ध प्रक्रिया सुरू आहे.

(सर्व ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका)

११–१६ जून: प्रभाग रचनेसाठी संगणकीय गट स्थापन
१७–१८ जून: जनगणनेची माहिती तपासणी
१९–२३ जून: स्थळव्यवहार (Ground‑survey)
२४–२६ जून: गूगल मॅपवर प्रभागांचा आराखडा
२७–३० जून: नकाशावर निश्चित रेखा जागेवर पुनरावलोकन
१–३ जुलै: मसुद्यांवर समितीच्या स्वाक्षऱ्या
४–८ जुलै: प्रारूप प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविणे
१५–२१ जुलै: प्रारूप जाहीर; हरकती व सूचना मागविणे
२२–३१ ऑगस्ट: हरकतींची सुनावणी
१–७ ऑगस्ट: हरकत‑सूचना विचारून अंतिम मसुदा आयोगाला पाठविणे
२२ ऑगस्ट–१ सप्टेंबर: आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना अधिसूचित

(‘ड’ वर्ग महानगरपालिका, नगर परिषदा व पं. समित्या)

११–१६ जून: संगणकीय गट
१७–१८ जून: जनगणनेची माहिती
१९–२३ जून: स्थळ परीक्षण
२४–३० जून: गूगल मॅपवर नकाशा
१–३ जुलै: नकाशे तपासणी
४–७ जुलै: मसुद्यावर समितीची स्वाक्षरी
८–१० जुलै: प्रारूप आयोगाला पाठविणे
२२–३१ जुलै: प्रारूप जाहीर राहील; हरकतीसाठी आमंत्रित
१–११ ऑगस्ट: हरकत सुनावणी
१२–१८ ऑगस्ट: अंतिम मसुद्याची शिफारस
२९ ऑगस्ट–४ सप्टेंबर: आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना अधिसूचित

‘ड’ वर्ग महानगरपालिकांतील विशेष नियम

सर्व प्रभाग ४ सदस्यीय करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न; परंतु शक्य सहा प्रभाग तीन वा पाच सदस्यीय किंवा दोन 3 सदस्यीय राहतील. यामध्ये अकोला, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यनगर, सोलापूर, सांगली–मिरज–कुपवाड, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, मिरा‑भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी–निजामपूर,परभणी, पनवेल, इचलकरंजी, जालना या महापालिका येतात.

महानगरपालिकांची वर्गवारी आणि रचनेतील बदल
अ वर्ग महानगरपालिका: पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका: ठाणे, नाशिक, पिंपरी‑चिंचवड
क वर्ग महानगरपालिका: नवी मुंबई, वसई‑विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण‑डोंबिवली
मुंबई महानगरपालिका: प्रभाग रचनेत बदल नाही — पुण्यातील जुन्या 227एकसदस्यीय प्रभाग रचनेचा वापरच
इतर सर्व महानगरपालिका चार सदस्यीय प्रभाग असतील

प्रभाग रचनेत बदल होणाऱ्या महानगरपालिका

पिंपरी‑चिंचवड, नवी मुंबई, वसई‑विरार, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण‑डोंबिवली, अमरावती, अहिल्यनगर, सांगली‑मिरज‑कुपवाड, मिरा‑भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड‑वाघाळा, या महानगर पालिकांच्या प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे राज्यातील प्रभागांची अंतिम रचना १ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आयोजन झाले आहे, ज्यात प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका आपले नियोजित टप्प्यांनुसार प्रक्रिया पार पाडणार आहेत.

Disclaimer : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नऊ टप्प्यात हे नियोजन करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.

Leave a Comment