Disclaimer : मराठवाड्यातील चव्हाण, देशमुख, मुंडे, टोपे/राजूरकर घराणे राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात मोठे वर्चस्व ठेवतात. हे घराणे त्यांच्या सत्ता आणि साथीदारांच्या मदतीने विकासाचे नियोजन करतात. परंतु इतरत्र नव्या नेतृत्वाच्या मार्गात अडथळा निर्माण करतात.
Marathwada Political Families : पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात 116 विधानसभा जागांपैकी 54 आमदार आणि 8 खासदार हे घराण्याशी संबंधित आहे. ही घराणेशाहीची व्यापक उपस्थिती दर्शवणारी आकडेवारी आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 82% जागांवर घराणादार उमेदवार होते. यातून पारंपारिक घराण्यांची सत्ता अधिक दृढ होती. बरेच राजकीय घराणे जसे पवार, देशमुख मुंडे…हे साखर कारखाने, दुग्धसंघ, शिक्षण संस्थांचे नियंत्रण ठेवतात. यामुळे आर्थिक अन् राजकीय प्रभुत्व वाढवते. मराठवाड्यातल्या 13 प्रमुख राजकीय कुटुंबांपैकी किमान 9 कुटुंब साखर सहकारी संस्था नियंत्रित करतात. या उपक्रमांनी राजकीय आधाराला ताकद दिलीय.
या घराणेशाहीचा मराठवाड्याच्या विकासावर परिणाम होतोय. नव नेतृत्वाचा मार्ग रांधला जातो. घराणेशाहीचा वारसा नसलेल्या उमेदवारांना संधी कमी मिळतात. नवशक्तीला प्रवेश रोखला जातो, यामुळे राजकारणात त्यांची मक्तेदारी निर्माण झालीय. मराठवाड्यातील विकासाच्या प्रकल्पांमध्ये घराण्यांचं नियंत्रण आहे. राजकीय संस्थांचा दुरुपयोग केला जातोय. सहकार संस्था, कृषी बाजार समित्या, शैक्षणिक संस्था घराण्यांच्या हस्तक्षेपाखाली असतात; समाजात राजकीय लाभासाठी पकड राखली जाते. त्यामुळे निधी–वाटप, प्रकल्पांची सुरुवात आणि अंमलबजावणी निष्पक्ष होत नाही. याचा परिणाम विकासावर होतोय.
मराठवाड्यात सध्या कोणत्या राजकीय घराण्यांचं वर्चस्व?
घराण्यांच्या प्रभुत्वामुळे गुंतवणूक अन् लक्ष पाश्चिमात्य जिल्ह्यांना जाते, तर मराठवाडा मागे राहतो. उद्योग-इन्फ्रास्ट्रक्चर यांचा पुरवठा अपुरा पडतो .प्रदेशीय विकास मंडळे आणि कल 37 अंतर्गत निधींचे नियोजनही घराण्या आधारित निर्णयांच्या अधीन राहतात. घराण्यांनी राजकीय अन् आर्थिक शक्ती गवसली, परंतु यामुळ विकासात्मक व्यक्तींना संधी मिळत नाही. यामुळे
नवशक्ती, तज्ञांचे नेतृत्व मराठवाड्यात विकसित होत नाही. खर्च आणि धोरणे घराण्यांच्या आर्थिक‑औद्योगिक हितासाठी केंद्रित होतात. राजकीय विवाह, घराण्यांमधल्या जुळवणींमुळे सत्ता कायम राहते. राजकीय पक्षांपेक्षा घराण्यांचे पात्र अधिक महत्त्वाचे ठरते.
https://youtube.com/shorts/FKBZU5lipG0?feature=share
मराठवाड्यात सध्या कोणत्या राजकीय घराण्यांचं वर्चस्व आहे, ते जाणून घेऊ या. देशमुख घराणं लातूर आणि आसपासच्या भागात सामाजिक-राजकीय वर्चस्व राखत आहेत. विलासराव देशमुख, अमित देशमुख अन् धीरज देशमुख यांची लातूरमध्ये चांगली चलती आहे. बीड अन् छत्रपती संभाजीनगर परिसरात मुंडे घराण्याची राजकीय वर्चस्व आहे. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडे हे लोकप्रिय नेते आहेत. जातीय राजकारण हा त्यांचा कणा असल्याची टीका केली जात आहे. टोपे–घुगरे, राजूरकर घराणे हे देखील मराठवाड्यातील चर्चेत असलेली घराणे आहेत. त्यांचा जालना, परभणी अन् हिंगोली जिल्ह्यांच्या राजकारणात आणि सहकारी उद्योगात मोठा प्रभाव आहे.
राजकीय घराणेशाही आणि गुंडगिरी
राजकीय घराणेशाहमुळे स्थानिक गुंडराजचा उदय होतो. आपण त्याची काही उदाहरणे पाहू या. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपांमध्ये वामलिक कराड नावाचा गुंड सापडतो, तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा नजदीकी म्हणून ओळखला जातो. या प्रकरणातून स्पष्ट होते की, राजकीय घराणेशाहीचा गुंडवर्गाशी सीधा संबंध आहे. संभाजीनगरमध्ये तहसिलदारांच्या 100 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप होतात. हे राजकीय संरक्षणाशिवाय शक्य नाहीत. भ्रष्टाचारामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या फसत असल्याचे चित्र स्पष्ट. ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये कोट्यवधींच्या गुंडगिरीचा पर्दाफाश केला, घराणेशाहीच्या बोलबळाशिवाय अशा घोटाळ्यांना कोर्टात पोहोचणे अवघड आहे.
समुदाधारित पतसंस्थांना धोकेही घराणेशाहीच्या संरचनेतून सुरू होतात. बीडमध्ये सरपंच हत्येची पार्श्वभूमी जातीय तणाव आणि गुंडगिरीचा संदर्भ आहे, तिथे घराणेशाहीने जातीय मते राजकारणासाठी वाटाघाटी केल्याचं बोललं जातंय. आपला दबदबा राखण्यासाठी घराणे गुंडांना पोसतात, यामुळेच गुन्हेगारी वाढते. राजकीय घराणेशाही गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराचा घनिष्ठ संबंध आहे. महत्त्वाच्या पदांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना संरक्षण मिळते. घराणेशाहीवर आधारित गुंडराजामुळे खासगी फायद्यांसाठी प्रशासन आणि संसाधने वळवली जातात, ज्यामुळे प्रशासकीय संस्थांचा विश्वास कमी होतो. गुंडगिरीची वाढ शेतकरी, स्थानिक अर्थव्यवस्था, समाजातील सामंजस्य या सगळ्यांवर परिणाम करते.
घराणेशाहीचा नेतृत्वावर नियंत्रण
सहकारी उद्योगातून सत्तेचा आधार निर्माण केला जातोय. साखर कारखाने, दुग्धसंघ हा या घराण्यांचा आर्थिक कणा आहे. नव नेतृत्वाला वाटस मार्ग नाही. घराण्यांच्या दबदब्यामुळं नवा राजकीय आवाज दाबला जातोय. प्रमुख घराण्यांचे जातीय राजकारण विकास विषयांना मागे ढकलते. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्यात नेतृत्त्व करण्यासाठी राजकीय घराण्यांचा अपरिहार्य वाटा आहे. हे घराणे फक्त सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर उद्योग, सहकारी संस्थांतून आर्थिक आधार तयार करून विकास प्रक्रियेत सुद्धा एखाद्या प्रकारे हस्तक्षेप करतात.
घराण्यांचा मराठवाड्यावर प्रभाव पडतोय. राजकीय नियंत्रण अन् सत्ता वाढली. घराण्याचे नाव आणि समर्थनामुळे मतदान ठरते, तर विरोधी आवाज मार्जिनमध्ये जातात. साखर कारखाने, दूध संघ या उद्योगांवर नियंत्रण राखून घराणे आर्थिक प्रभुत्व वाढवतात. घराण्यांच्या प्रभुत्वामुळे नवउद्योजकांना अवसर कमी मिळतो. यामुळे विकास मात्र अडथळ्यात सापडतो,
Hello lokswarajyalive.in,
I visited your website online and discovered that it was not showing up in any search results for the majority of keywords related to your company on Google, Yahoo, or Bing.
Do you want more targeted visitors on your website?
We can place your website on Google’s 1st Page. yahoo, AOL, Bing. Etc.
If interested, kindly provide me your name, phone number, and email.
Well wishes,
Nishant Sharma | Digital Marketing Manager
Note: – If you’re not Interested in our Services, send us “opt-out”
Can You Please Msg On 7770091481 This Number … We Can Discuss Regrading this Thank you …