Nitin Gadkari Will Make Big Announcement On Toll Tax: आपल्याला कुठेही जायचे असेल तर, फक्त एकच डोकेदुखी असते. प्रत्येक वेळी 20-25 किमीच्या अंतरावर येणारा टोल आणि त्याचे महागडे शुल्क. टोलमुळे हा प्रवास नकोसा वाटतो. सर्वांनाच टोल प्रणालीत मोठा बदल अपेक्षित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या तीन दिवसांत यासंदर्भात मोठा काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खुद्द मंत्री गडकरींनीच संकेत दिले आहेत. टोल प्रणालीत काय बदल होणार? नवीन प्रणाली येणार? आता शुल्क कसे आकारले जाते? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहनधारकांना मोठा दिलासा
देशभरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबाबत मोठे विधान केलंय. त्यांनी येत्या तीन दिवसांत मोठी घोषणा करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा अशी असणार आहे की, सर्वांना आनंद होईल, असेही संकेत नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
सरकार टोल कराबाबत एक मोठा निर्णय घेणार आहेत, ज्यामध्ये टोल गेट पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी एप्रिल 2025 मध्येही नितीन गडकरी यांनी टोल गेट रद्द करण्याचे संकेत दिले होते. त्याचबरोबर महामार्गावरील ट्राफिक आणि मनमानी वसुलीपासून लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
टोलवरून मला ट्रोल करणार नाही
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना नितीन गडकरी यांना विचारले गेले की, तुमच्या कामाचे जितके कौतुक केले जाते तितकेच टोल मंत्री म्हणून तुमचेही बरेच मीम्स बनवले जातात. सध्या जर सर्वात जास्त मीम्स कोणी बनवले असतील, तर ते तुम्हीच आहात. जनतेला जाणून घ्यायचे आहे की, टोलवर इतके पैसे का आकारले जातात? यावर नितीन गडकरी म्हणाले, सर्व तयारी झाली आहे. मी आजच आलो आहे. आम्ही दोन-चार दिवसांत घोषणा करू. टोलबाबत कोणतीही अडचण येणार नाही. मी अशी योजना जाहीर करतोय, ज्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. मी तीन दिवसांनी अजून माहिती उघड करेन. तोपर्यंत अधिसूचना येईल, मी त्यावर स्वाक्षरी करेन आणि घोषणा करेन. असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तीन दिवसांनंतर कोणीही मला ट्रोल करणार नाही, असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
सरकार मोठी योजना आखण्याच्या तयारीत…
नितीन गडकरी यांच्या या विधानानंतर टोल शुल्काबाबतच्या अटकळांना उधाण आलंय. आता वाहनचालकांना टोल प्लाझावर रांगेत उभे राहावे लागणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. वाहन जितका प्रवास करणार, तितका टोल बँक खात्यातून आपोआप कापला जाईल. ही संपूर्ण व्यवस्था डिजिटल पद्धतीने चालेल, असं म्हटलं जातंय. टोल प्लाझावर जाममध्ये अडकून कोणालाही वेळ वाया घालवावा लागणार नाही, असं बोललं जातंय.
सरकार लवकरच आजीवन टोल पास सुरू करण्याची योजना आखत आहे. यासाठी, खाजगी कार वापरकर्त्यांना कारच्या वयासाठी म्हणजेच 15 वर्षांसाठी आजीवन टोल पास मिळविण्याचा पर्याय मिळेल, ज्याची किंमत सुमारे तीस हजार रुपये असल्याचे मानले जाते. यानंतर, त्यांना कोणत्याही प्रकारच्या टोल प्लाझावर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आता टोलबाबत सरकारची काय योजना आहे, हे तीन दिवसांनीच उघड होण्याची अपेक्षा आहे.
टोल प्लाझा आता कोणत्या प्रणालीवर काम करतात?
सध्या देशातील महामार्गांवर सुमारे 20 ते 30 किलोमीटरच्या परिघात टोल प्लाझा बांधले जातात. एक्सप्रेस वेवर हे अंतर जास्त असते, परंतु थोडा प्रवास केल्यानंतर टोल शुल्क भरावे लागते, जे फास्टॅगद्वारे भरले जाते. जेव्हा टोल प्लाझाचा सर्व्हर डाउन असतो किंवा जास्त गर्दी असते, तेव्हा लोकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. सरकारच्या या नवीन पावलामुळे लोकांना दिलासा मिळू शकतो, असं मानलं जातंय.
वारकऱ्यांना टोल माफ…
सध्या देश विठुरायाच्या नामघोषात रंगला आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. हा राज्य भरातील भक्तांसाठी खास सोहळा असतो, वर्षभर ते या क्षणाची वाट पाहतात. आषाढी वारीदरम्यान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफीचा निर्णय शासनाने घेतला आहे. मानाच्या पालख्या, जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. पालखी मार्गावर 18 जून ते 10 जुलैदरम्यान वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे. टोलमाफीचा निर्णय 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांसाठी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्णय जारी करण्यात आलाय.
Disclaimer: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी दोन-तीन दिवसांत आनंदाची बातमी देणार आहेत. टोल संदर्भात मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.