Shivajirao Kardile Political Journey : दूध व्यवसायातून राजकारणाच्या शिखरावर! नेते शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास

Shivajirao Kardile Political Journey : नेते शिवाजीराव कर्डिले यांचे राजकीय प्रवास

Disclaimer : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे यांचे आज (१७ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. साध्या दूध व्यवसायातून राजकारणात प्रवेश करून त्यांनी पाच वेळा आमदारकी मिळवत स्वतःचं स्वतंत्र राजकीय घराणं निर्माण केलं. आपण त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ या.

shivajirao Kardile Political Journey : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजी भानुदास (शिवाजीराव) कर्डिले यांचे (१७ ऑक्टोबर) ह्रदयविकाराने निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीय. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले कर्डिले यांनी बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंतचा पल्ला गाठला होता.

कर्डिले यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसायाचा होता, परंतु लोकसंपर्क, सामाजिक कार्य आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1979054402326438277

राजकीय कारकिर्द कशी सुरू झाली? Shivajirao Kardile Political Journey

शिवाजीराव कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. बुऱ्हानगर गावातील सरपंचपदावरून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. सुरुवातीला त्यांनी काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेवटी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द पुढे नेली.

बुऱ्हानगर या गावातील एक सर्वसामान्य दूध व्यावसायिक म्हणून आपली वाटचाल सुरू करणारे शिवाजीराव कर्डिले हे नाव काही दशकांतच नगर जिल्ह्याच्या सत्तेच्या सारीपाटावर ठळकपणे उमटले. दूध संकलन आणि विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी गावात लोकसंपर्क आणि विश्वास निर्माण केला. सामाजिक कार्यासाठी त्यांनी बाणेश्वर तरुण मंडळ स्थापन केले, ज्यातून त्यांना ग्रामराजकारणात ओळख मिळाली. Shivajirao Kardile Political Journey या कामातूनच ते बुऱ्हानगर गावाचे सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.१९९० च्या दशकात काँग्रेसमधील गटबाजी आणि स्थानिक बंडाळीचा फायदा घेत कर्डिले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि आमदारकी पटकावली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अखेर भारतीय जनता पक्ष अशा विविध पक्षांतून प्रवास केला. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्थानिक पातळीवर मजबूत संघटना उभी केली आणि आपले राजकीय घराणे निर्माण केले. Shivajirao Kardile Political Journey नगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील घराण्यांच्या वैरातून निर्माण झालेली राजकीय पोकळी त्यांनी चतुराईने भरून काढली. त्यांच्या नेतृत्वाखाली राहुरी-नेवासा परिसरात ‘कर्डिले घराणे’ हा स्वतंत्र राजकीय प्रभाव निर्माण झाला. कर्डिले यांनी स्थानिक बांधकाम व्यवसाय, दूध उद्योग आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपले आर्थिक साम्राज्य उभारले. ते अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तसेच संचालक म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या अनेक निर्णयांवर त्यांचा प्रभाव होता. Shivajirao Kardile Political Journey

अधिक माहितीसाठी-www.youtube.com/@LokswarajyaLive

दूध व्यवसाय ते आमदारकी

१९९५ साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगर-नेवासा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर १९९९ मध्ये पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच ते आमदार झाले. २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून आमदारकी मिळवली, तर २००३-०४ या काळात ते राज्याचे मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्री होते. २००९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. Shivajirao Kardile Political Journey २०१४ मध्ये भाजपकडून राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचारासाठी राहुरी येथे जाहीर सभा घेतली होती. २०१९ मध्ये मात्र त्यांना भाजप उमेदवार म्हणून पराभवाचा सामना करावा लागला. तरीही ते स्थानिक राजकारणात सक्रिय राहिले आणि २०२३ मध्ये अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून ते निवडून आले.

शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास

१९८४-१९९५: बुऱ्हानगर (ता. नगर) सरपंच
१९९०: बानेश्वर शैक्षणिक संस्थेची स्थापना
१९९५: नगर-नेवासा अपक्ष आमदार
१९९९: नगर-नेवासा अपक्ष आमदार
२००३-०४: राज्यमंत्री (मत्स्य व बंदरे विकास)
२००४: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार, नगर-नेवासा
२००७: अहिल्यानगर जिल्हा बँक संचालक
२००८-०९: अहिल्यानगर जिल्हा बँक चेअरमन
२००९: राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा उमेदवारी (पराभव)
२०१४: भाजप आमदार, राहुरी-नगर-पाथर्डी
२०१९: भाजप उमेदवार, राहुरी-नगर-पाथर्डी (पराभव)
२०२३: चेअरमन, अहिल्यानगर जिल्हा बँक
२०२४: भाजप आमदार, राहुरी-नगर-पाथर्डी

अधिक माहितीसाठी- instagram.com/lokswarajyalive?igsh=MTR1ZXBlZTl1NTB2ZA==

ग्रामीण भागातील विकास आणि शेतकरी प्रश्न

शिवाजीराव कर्डिले यांनी आयुष्यभर ग्रामीण भागातील विकास आणि शेतकरी प्रश्नांसाठी काम केले. त्यांच्या निधनाने भाजपसह संपूर्ण नगर जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे. Shivajirao Kardile Political Journey त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या प्रवासावर वाद, राजकीय कटुता आणि काही गुन्हेगारी प्रकरणांचे आरोप असले तरी, शिवाजीराव कर्डिले यांनी आपले राजकीय अस्तित्व कधी कमी होऊ दिले नाही. ते थेट, निर्णयक्षम आणि जमिनीशी जोडलेले नेते म्हणून ओळखले जात. शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेशी असलेली त्यांची जवळीक हीच त्यांची खरी ताकद मानली जायची.

शिवाजीराव कर्डिले यांनी आयुष्यभर ग्रामीण भागातील विकास आणि शेतकरी प्रश्नांसाठी काम केले. साध्या दूध व्यवसायातून सुरुवात करून पाच वेळा आमदार आणि एकदा राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या शिवाजीराव कर्डिले यांचा प्रवास नगर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कायम लक्षात राहील. Shivajirao Kardile Political Journey

Leave a Comment