कार उभी, चपला सापडल्या… आणि 1300 फूट खाली मिळाले मृतदेह! सुसाईड नोटमुळे उकलतेय गुंतागुंत

Talathi Ramchandra Pardhi Young Girl Ends At Kokan Kada: पुणे जिल्ह्यातील शांत, पण भयावह कोकणकडा… आणि तिथे सापडले दोन मृतदेह. एक सरकारी कर्मचारी, आणि एक अल्पवयीन विद्यार्थिनी. प्रेम, तणाव, की काही वेगळं? नेमकं काय घडलं? जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकड्याच्या 1300 फूट खोल दरीत दोन मृतदेह सापडले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र पारधी आणि जुन्नरमधील महाविद्यालयात शिकणारी अल्पवयीन मुलगी – रूपाली खुटाण. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही आत्महत्येची घटना असल्याचं मानलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात दुर्गवाडी कोकणकड्याच्या 1300 फूट खोल दरीत दोन मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र पारधी (वय 40) आणि जुन्नर येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी रुपाली खुटाण यांचे हे मृतदेह होते. दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक पोलिस अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनास्थळाजवळ रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांच्या नावाने लिहिलेल्या सुसाईड नोट्स आढळून आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आत्महत्येची कारणं स्पष्ट करण्यात आली आहेत. पारधी यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून मानसिक छळ झाल्याचा उल्लेख केला असून, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तर रूपालीने तिच्या पालकांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे नमूद केलंय.

या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी मृतांच्या नातेवाइकांची चौकशी सुरू केली आहे. तसेच, रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पांढऱ्या रंगाची कार कोकणकड्याजवळ पार्क केल्याचे आढळले आहे. ही कार तीन-चार दिवस तिथेच उभी राहिल्यामुळे ग्रामस्थांच्या संशयास कारणीभूत ठरली. त्याच दरम्यान, कड्याच्या टोकावर सापडलेल्या चपलांच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली आणि खोल दरीत मृतदेह सापडले. ही कार लॉक अवस्थेत होती. ती पोलिसांनी टोईंग करून जुन्नर पोलीस ठाण्यात आणली असून, आतील तपासणीतून अधिक काही पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जुन्नर पोलिस आणि बचाव पथकाने अत्यंत कठीण परिस्थितीत 1300 फूट खोल दरीत उतरून दोघांचे मृतदेह वर काढले. स्थानिक ग्रामस्थांनीही या मोहिमेसाठी मदत केली. ही आत्महत्या आहे की यामागे आणखी काही गूढ आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

शांत निसर्ग… गूढ दरी… आणि दोन नावे – रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण. जुन्नरच्या दुर्गवाडी कोकणकड्याने दोन जीव कायमचे गिळलेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात दुर्गवाडी कोकणकड्याच्या 1300 फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळले. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी आणि एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे नाव समोर आलं आहे. रुपाली खुटाण. दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अजून काही दडलेलं आहे?

गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या रंगाची कार कोकणकड्याजवळ उभी होती. ग्रामस्थांच्या लक्षात आलं, आणि मग दरीच्या टोकावर चपला आढळल्या… शेवटी खोल दरीत दोन मृतदेह सापडले. पोलिसांनी दोघांच्या जवळून सुसाईड नोट्स जप्त केल्या आहेत. रामचंद्र पारधी यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलं – ‘माझ्या पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे. कृपया त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा.’ तर, रुपाली खुटाणने तिच्या पालकांकडून होणाऱ्या मानसिक दबावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला.

दोन वेगळ्या कहाण्या… एकच शेवट. दरी 1200 फूट खोल… पोलीस आणि रेस्क्यू टीमने प्रचंड मेहनतीने दोघांचे मृतदेह वर काढले. गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात आणखी पुरावे मिळू शकतात का – याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याचा आणि एका विद्यार्थिनीचा असा शेवट झाल्याने सर्वांनाच हुरहूर लागली आहे. हा फक्त आत्महत्येचा प्रकार आहे की अजून काही दडलेलं आहे? पोलीस तपास सुरू आहे. जुन्नर पोलीस आणि रेस्क्यू टीमने बिकट परिस्थितीत दोघांचे मृतदेह वर आणले. पारधींची पांढरी कार सध्या पोलीस ताब्यात आहे. तपास सुरू असून, अजून पुरावे गाडीतून मिळतील का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Disclaimer: पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि अल्पवयीन तरुणीचा मृतदेह दरीत आढळून आला. या दोघांनी दुर्गवाडी कोकणकड्याच्या 1300 फूट खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. आपण या घटनेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.

Leave a Comment