vijay wadettiwar on obc reservation : OBC आरक्षण मिळवण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही

ओबीसी समाजाने रडण्याऐवजी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे– माजी मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar)

vijay wadettiwar on obc reservation : Nagpur | महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ओबीसी समाजाने रडण्याऐवजी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. आत्महत्या हा कधीच पर्याय असू शकत नाही.” नागपुरात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आणि सरकारवर जोरदार टीका केली.

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

  • विविध संघाटनामध्ये काम करणारे निवडक नेत्यांची बैठक बोलावली आहे, आजच्या बैठकीत चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसींचे नेते जातील, झालेला अन्याय सांगतील, ओबीसी आरक्षणाचे वाटोळे या सरकारने कस केलं याची माहिती देतील
  • प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चात सहभागी कशी होतील याचा नियोजन करण्यात येईल, 30-35 प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत

छगन भुजबळ – मनोज जरांगे वादावर प्रतिक्रिया

  • कोणाला नेपाळला सोडायचे, कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार, त्यामुळे अशा प्रकारचा वक्तव्य करणे मनोज जरांगेंनी टाळायल पाहिजे, पाठवायचं असेल चळवळीमध्ये जे काम करत असेल त्यांना परदेशात पाठवायचं असेल तर त्या एकट मनोज मनोज जरांगेंनीच महाराष्ट्रात राहायचं आहे का?
  • आमच्या समाज बांधवांचा सामाजिक आणि न्यायिक अधिकार टिकवणे आणि लढणे या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारचे टीका करणे हे भुजबळांनी आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा टाळलं पाहिजे

ओबीसी तरुणाची आत्महत्या – सरकार जबाबदार

त्यांनी मोर्चात मागणी लावून धरली मुंबईत, पण या तरुणाने लातूरच्या सातत्याने ओबीसी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता.

प्रत्येक ओबीसी बैठकीला मेळाव्याला जात होता, ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता, त्यामुळे हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली.

मी पण येत्या दोन दिवसात त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार.

या ओबीसी तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी जे लिहून ठेवले, आणि ती मागणी केली त्यामुळे जे काही सोंग सरकार घेताय, त्यातून या ओबीसींच्या वर झालेला अन्याय आणि ज्याचा काहीही संबंध नाही, अशा लोकांचा शिरकाव हे बघता मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे.

सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि यासाठी सरकार यासाठी जबाबदार आहे, त्यामुळे कुटुंबीयांना भरपूर मदत केली पाहिजे आणि सरकारने त्या जीआर चा पुनर्विचार केला पाहिजे.

आत्महत्या हा पर्याय नाही

  • मी कालही त्या पद्धतीचा आवाहन केलय, आणि मी पुन्हा सांगतो ओबीसी तरुणांना आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरू, संघर्ष करू, आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचे घडेल त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू, त्यासाठी तयार राहा परंतु कोणीही अशा आत्महत्या कडे प्रवृत्त होऊ नये
  • रडण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा असे मी आवाहन करतो

बंजारा समाज आणि आरक्षणाचा प्रश्न

  • मुंडे देखील सत्तेमधील आमदार आहेत, आणि त्यांनी जर ही मागणी केली असेल तर सरकारची भूमिका काय आहे याकडे आमचं लक्ष आहे, आता हैदराबाद गॅझेटीयरचा विषय काढून आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये नेत असतील तर मग बंजारा समाजाला सुद्धा त्या गॅझेट इयर मध्ये एसटी म्हणून म्हणून उल्लेख आहे आणि अशा वेळेस त्यांनी जी मागणी केली
  • त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे, सरकार म्हणून त्यांना लागू केलं म्हणून यांना लागू करेल का याकडे आमचं लक्ष आहे.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी

  • आमचं 2019 ला सरकार आलं त्यावेळी आम्ही 39 हजार कोटींची कर्जमाफी केली होती, आणि आताचे सरकार घोषणा करूनही कर्जमाफी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे जे काही आंदोलन असेल त्या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची आमची भूमिका असणार आहे.

निष्कर्ष

vijay wadettiwar on obc reservation- (discription) विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी समाजाला दिलेला संदेश स्पष्ट आहे – “हक्कासाठी संघर्ष करा, पण जीवन संपवू नका.” या विधानामुळे महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीत पुन्हा एकदा उर्जा निर्माण झाली आहे.

Disclaimer : या लेखातील मजकूर राजकीय नेत्यांनी केलेल्या विधानांवर आणि उपलब्ध बातम्यांच्या वृत्तांवर आधारित आहे. लोकस्वराज्य येथे व्यक्त केलेल्या कोणत्याही राजकीय दाव्यांचे किंवा मतांचे समर्थन करत नाही. वाचकांना निष्कर्ष काढण्यापूर्वी माहिती स्वतंत्रपणे पडताळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करुन कळवा. सोबतच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि युट्यूब चॅनलला सबक्राईब करा. http://www.youtube.com/@LokswarajyaLive

instagram.com/lokswarajyalive?igsh=MTR1ZXBlZTl1NTB2ZA==

whatsapp.com/channel/0029VbArXcdFcowCtuJrcH1D

Leave a Comment